Big9news Network
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर ही राज्यातील एकमेव शासनमान्य संघटना असून राज्यातील परिचारिकां संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यासाठी संघटनेने मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना काम बंद आंदोलनाचे निवेदन दिले आहे, फेब्रुवारी २०२० पासून राज्यातील सर्व परिचारिका कोव्हिड रुग्णांना सातत्याने जिवाची बाजी लावून सेवा देत आहेत.याकाळात इतर सर्व विभागातील कर्मचारी घरी बसून होते, परंतु परिचारिका आपले कुटुंब,मुलं-बाळं त्यांच्यापासून दूर राहून, स्वतःच्या व कुटूंबाच्या जिवाची पर्वा न करता,रुग्णसेवा करत आहेत. मागील वर्षी राज्यातील परिचारिकांना अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले, परंतु अद्याप पर्यंत शासनाने कसलीही कार्यवाही केलेली नाही, राज्यात परिचारिकांचे मनुष्यबळ अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे आपल्या मनुष्यबळावर काम करताना परिचारिकांवर प्रचंड ताण पडतो.कोरोना रोटेशन काळात शासनाने परिचारीकांची साप्ताहिक सुट्टी ही बंद केली. जिवाची बाजी लावून लढणाऱ्या परिचारिकांकडे शासन अनेक वर्षापासून दुर्लक्ष करत असून आता परिचारिकांच्या सहनशीलतेची सिमा संपली आहे, त्यामुळे राज्यातील परिचारिकांनी दिनांक २१ व २२ जुन रोजी सकाळी ८:००ते १०:०० काम बंद आंदोलन, २३ व २४ जुन २०२१ रोजी पुर्ण वेळ काम बंद आंदोलन व याकाळात शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर दि. २५ जुन २०२१ पासून बेमुदत संप पुकारला आहे.
आजही शासनाकडून साथ कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्याची व नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी परिचारिकांना देत आहे, गेले वर्षभर राज्यात परिचारिकांची प्रचंड कमतरता आहे. प्रसंगी केरळहून परिचारीका मागण्याचा निर्णय घेतला होता, तेच शासन आता आपली कृतघ्नपणा दर्शवून संवेदनशील मागण्यांसाठी उठणारा आवाज दाबण्याचा प्रयत्न शासनाकडून होताना दिसत आहे.
परिचारिकांची पदे १०० टक्के भरावीत, नेहमीच कुठल्या न कुठल्या साथरोग आपत्कालीन परिस्थिती त जिवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या परिचारिकांना केंद्रशासनाप्रमाणे जोखीम भत्त्ता ७२०० देण्यात यावा.
कोरोंटाईन रजा व साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी, परिचारिकांचे पदनाम बदल करण्यात यावे, कोरोना काळात सर्व रजा स्थगित केल्यामुळे ३०० पेक्षा जास्त शिल्लक राहून रद्द होत आहेत त्या शिल्लक ठेवण्याची व पुन्हा उपभोगण्याची परवानगी देण्यात यावी, ७व्या वेतन आयोगाचे व महागाई भत्त्याचे थकित हप्ते देण्यात यावे. या अशा जिव्हाळ्याच्या १२ मागण्यांसाठी परिचारिकांचे राज्यव्यापी आंदोलन होणार आहे, या आंदोलनास राज्यातील विविध संघटना, राजकीय नेते, लोकप्रतिनिधीनी पाठिंबा दर्शविला आहे असे राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे,यांनी सांगितले. तर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर संघटनेने पुकारलेले हे राज्यव्यापी आंदोलन.
हे परिचारीकाच्या हक्कासाठी, न्यायासाठी, जोखीम भत्त्यासाठी व विविध मागण्यासाठी असून कोरोना महामारीत आपला जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या परिचारिकांचे आहे, त्यांना पण कुंटूंब आहेत,सण उत्सव आहे पण सर्व गोष्टी बाजूला ठेवून परिचारिका जनतेची सेवा करतात, म्हणून या आंदोलनाला जनतेने, लोकप्रतिनिधींनी,सर्व समाजाने पाठिंबा द्यावा असे आवाहन,व कळकळीची विनंती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्याध्यक्ष मनिषा शिंदे मॅडम,राज्यपाध्यक्ष शाहजाद बाबा खान, मंगला ठाकरे, भिमराव चक्रे सर, हेमलता गजबे, राज्य कार्याध्यक्ष अरुण कदम , राज्य सहसरचिटणीस अजित वसावे, अमोल कवाने, सुकुमार गुडे,राज्यखजिनदार राम सुर्यवंशी, राज्य कार्यकारिणी सदस्य पांडूरंग गव्हाणे यांनी केले