Big 9 News Network
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन
सोलापूर l महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासह सातवा वेतन आयोग लागू करून त्यांचे प्रलंबित असलेले हे दोन प्रश्न सोडवण्याची ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनच्या वतीने त्यांना छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयांमध्ये जाऊन शिष्टमंडळाने विविध मागण्याचे निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये लवकरच मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, ज्ञानेश्वर सपाटे, कॉलेज कर्मचारी युनियनचे सरचिटणीस अजित संगवे, उपाध्यक्ष दत्ता भोसले, बाबुराव व्यवहारे, शहाजी जाधव, दौलप्पा चाबुकस्वार, केशव लोंढे, महेश ढेंगळे, दत्तात्रय सुतार, भानुदास धंदुरे, संतोष अलकुंटे महादेव थिटे आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
Leave a Reply