BIG 9 NEWS NETWORK
सोलापुर – ड्रेनेजमधील चेंबर मध्ये उतरून काम करत असताना विषरी वायूमुळे मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार सोमवारी महापौर कार्यालयामध्ये पाच कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा नुकसानभरपाईचा धनादेश महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या शुभहस्ते व आयुक्त पी.शिवशंकर, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
मिळालेल्या धनादेशाचा उपयोग हा योग्य पध्द्तीने करावा. महापालिका आयुक्तांनी याचा पाठपुरावा करून धनादेशाचे वाटप केल्याचे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सांगितले.
उशिरा का होईना आयुक्त, महापौर यांनी मरणपावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना धनादेशाचे वाटप केले आहे याच पध्दतीने आयुक्त, महापौरांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी बोलताना दिली.
कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. येत्या काळामध्ये मरणपवलेल्या सुरवसे या कर्मचाऱ्याच्या वारसाला नियमानुसार कामावर घेण्याचा मी प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया आयुक्त पी.शिवशंकर यांनी बोलताना दिली.
दूषित गटारीमध्ये मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना महापालिकेमध्ये कामाला घेण्यात आलेले आहे परंतु यामधील मरणपवलेल्या सुरवसे या कर्मचाऱ्याच्या वारसाला अद्याप कामावर घेण्यात आलेले नाही त्यांना कामावर घेण्यात यावे अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी बोलताना केली.
यावेळी सभागृहनेते शिवानंद पाटील, कृतीसमितीचे अध्यक्ष अशोक जानराव, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, बाले मंडपू आदीजन उपस्थित होते.