Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर – प्रभाग ५ अ शिवाजी नगर येथील गणपती मंदिर ते नाल्यापर्यंतच्या १२ लाखांच्या रस्त्याच्या कामाचे व नाम फलकाचे उद्घाटन आ.विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रभागाच्या नगरसेविका स्वातीताई आवळे आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. येणाऱ्या काळामध्ये या परिसरातील नागरिकांच्या पाणी, ड्रेनेज, रस्ता अशी सर्व कामे पूर्ण करणार आहे असे आश्वासन आ.विजयकुमार देशमुख यांनी बोलताना दिले.

वसंत विहार, गायत्री नगर, शिवाजी नगर, बाळे शहर उत्तरचा विकास हा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत. पाणी, ड्रेनेज, रस्ते व लाईट या सोयी नागरिकांना पुरविण्यात आल्या आहेत शिवाजी नगर बाळे येथून येणाऱ्या निवडणूकिमध्ये भाजपचाच उमेदवार निवडून आला पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे यांनी बोलताना व्यक्त केले.

हद्दवाढ भागातील शिवाजी नगर, शिवाजीनगर तांडा, केगाव येथील सर्व कामासाठी आ.”विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व नगरसेविका स्वातीताई आवळे यांच्या निधीतून राहिलेली कामे प्राधान्याने पूर्ण करू असे मत युवानेते राजाभाऊ आलूरे यांनी व्यक्त केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे, राजाभाऊ आलूरे, विनय ढेपे, विद्या जाधव, पार्वती जाधव, सीमा शिंदे, अंजना अवघडे, सुनीता कोरे, डोके साहेब, नारायण बाबर, नितीन मुंडफने, धनंजय जाधव, उत्तम पाटील, पिंटू सलगर, श्रीकांत यादव, डॉ.कुलकर्णी आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *