Big9news Network
रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 25 शिक्षकांना नेशन बिल्डर हा पुरस्कार वालचंद कॉलेज समाजसेवा विभागाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांच्या हस्ते देवून सन्मान करण्यात आला. मेसॉनिक हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमाला रोटरीचे अध्यक्ष संजय पटेल, माजी प्रांतपाल झुबीन अमारीया, कौशिक शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
देश घडवण्यासाठी नवी पिढी शारीरीक आणि मानसिक दृष्ट्या सृदृढ असणे आवश्यक आहे आणि हे काम शाळेत शिक्षकच करू शकतात. शिक्षणाचे महत्वाचे काम करीत असताना त्यातून वेगळे काही तरी करून नव्या पिढीला घडवण्याचे उल्लेखनीय कार्य शिक्षकच करू शकतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी केले.
रोटरी कल्बच्या शैक्षणिक विभागाकडून इंग्रजीतील टीईएसीएच म्हणजेच टिच या अभियानांतर्गत शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. सन 2024 पर्यत भारत साक्षर करण्याचे उदिष्ट्य ठेवण्यात आले आहे त्यानुसार टिच अभियानानुसार टी म्हणजे शिक्षकांना ट्रेनिंग अंतर्गत जवळपास 2 लाख 11 हजार 679 शिक्षकांना आजपर्यत विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर ई म्हणजे 27 हजार 268 शाळांना ई लर्निंगचे किट उपलब्ध करून देण्यात आले. ए म्हणजे अॅडल्ट म्हणजे प्रौढ शिक्षणातून 88 हजार 5 प्रौढंाना साक्षर करण्यात आले.सी म्हणजे चाईल्ड लहान मुलांचे विकास यामधून जवळपास 43 हजार 140 मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आले. एच म्हणजे हॅपी स्कूल यातून 3 हजार 112 शाळांना हॅपी स्कूल करण्यात आले. असे हे अभियान राबवण्यात येत आहे. त्यातूनच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना निवडून त्यांना प्रोत्साहान मिळावे म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते असे आपल्या प्रास्ताविकात रोटरी क्लब सोलापूरचे अध्यक्ष संजय पटेल यांनी सांगितले. देश बलवान करण्यासाठी आणि जगात आपल्या देशाचा लौकीक वाढवण्यासाठी नवीन पिढी सशक्त आणि साक्षर असली पाहिजे यासाठी झटणारे शिक्षक मोलाचे कार्य करत असतात सन 2018 मध्ये रोटरी क्लब वतीने उल्लेखनीय कार्य केलेले रणजितसिंह डिसले गुरूजी यांचाही सन्मान नेशन बिल्डर अवॉर्ड देवून करण्यात आला होता आणि आज ते जागतिक पातळीवरील शिक्षक आहेत. रोटरी क्लब अशाच हिऱ्यांचा शोध घेवून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते म्हणूनच हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात महत्वाचा समजला जातो. असेही संजय पटेल यांनी सांगितले. सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थात उल्लेखनीय कार्य केलेल्या 25 शिक्षकांना यावेळी नेशन बिल्डर अवॉर्ड देवून गौरव करण्यात आला यावेळी रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
Leave a Reply