Big9news Network
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नळ जोडणी द्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत दि.२२ जुलै २०२१ ते दि.७ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले , दि.२२ जुलै २०२१ रोजी जल जीवन मिशन, राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना झूम ॲप द्वारे गाव कृती आराखडा बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.यामध्ये गाव कृती आराखडा मधील माहितीचे संकलन ,राबविण्याच्या प्रक्रिया ,कोबो टूल द्वारे माहिती अपलोड बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.दुसऱ्या टप्प्यात २३ जुलै ते २७ जुलै २०२१ या कालावधीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता),ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता,उपअभियंता,शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार ,पाणी गुणवत्ता सल्लागार, व तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक यांना झूम ॲप द्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे
तालुका पातळीवर सर्व गट विकास अधिकारी यांच्याकडून दि.२८ ते ३१ जुलै दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे.यामध्ये गाव कृती आराखडा बाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर , ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची दोन प्रतिनिधी ना झूम ॲप द्वारे प्रशिक्षण देणार आहेत.गाव पातळीवर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखडा च्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनाचा वापर करून संकलित करण्यात येईल.दि.५ ते ७ ऑगस्ट दरम्यान प्राप्त माहितीवरून कृती आराखडा ची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया करुन येत्या १५ ऑगस्ट २०२१ रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये मंजुरीकरिता कार्यक्रम पत्रिकेवर ठेवण्यात येणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले
गाव कृती आराखडा पंधरवड्यात जिल्हा कक्षातील तज्ञ सल्लागार तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, गावपातळीवर ग्रामसेवक, जलसुरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सहभाग घेऊन गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन / पाणी व स्वच्छता) परमेश्वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) चंचल पाटील,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी यांनी केले आहे.
Leave a Reply