Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

BIG 9 NEWS NETWORK

सोलापूर:- सोलापूर शहर विडी व यंत्रमाग सेलच्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण दासरी यांची निवड करण्यात आली. जुना अक्कलकोट रोड गांधी नगर येथे त्यांच्या कार्यालयाचा शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तर शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे, विजयश्री गायकवाड, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, उद्योगपती अशोक जैन, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, शिवाभाऊ गायकवाड यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी आपले विचार व्यक्त करताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, पूर्व भागात विडी कामगारांची संख्या खूप मोटठी आहे. पूर्व भागात बहुतेक घरात महिलामुळे घरातील चूल पेटत असते महिला अतिशय कष्ठाळू आहेत. पदमशाली समाजात महिलांचा आदर केला जातो. घरात महिला सर्वेसर्वा असतात. ज्या ज्या वेळी विडी कामगारांना अडचणी आल्या आम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत उभे राहिलो आहे, त्यांचे रोजगार वाचविण्यासाठी, मजुरीवाढीसाठी, व इतर अडचणी सोडविण्यासाठी गल्ली ते दिल्ली पर्यंत आंदोलन केले आहे. जगण्यासाठी त्यांच्या संघर्ष चालू असते. विडी कामगारांच्या पाल्यासाठी शिक्षणासाठी सहकार्य, मोफत शिवणकाम, कॉम्पुटर प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. विडी कामगार अक्का, चेल्लेलु (भगिनी) यांनी साथ दिल्यामुळेच मी तीन वेळा आमदार झाले हे मी कधीच विसरू शकणार नाही. आयुष्यभर त्यांचे ऋणी राहणार आहे. त्यांची सोबत शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही.

यावेळी पुढे बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाने विडी व यंत्रमाग सेलची जबाबदारी लक्ष्मीनारायण दासरी यांच्याकडे सोपविली असून त्यांना सामाजिक दृष्टीकोन असून तळमळीने विडी व यंत्रमाग कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, संघटना उभी करतील. त्यांना मी शुभेच्छा देते. असे म्हणाल्या.

यावेळी गांधीनगर भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय दासरी, मनोहर दासरी, विमालाबाई दासरी, सुशिलाबाई दासरी, कमला दासरी, लक्ष्मी दासरी, ज्योती दासरी, सुजाता दासरी, प्रसाद मादास, कृष्णाहरी कोमाकुल, पांडुरंग चेरमन, व्यंकटेश नागुल, किशोर पद्मा, अजय आडम, रामप्रसाद दासरी, संतोष दासरी, संजय दासरी, विलास दहीहंडे, नरेश कंदिकटला, किसन पासकटी, पुरुषोत्तम दासरी, दामोदर दासरी, सत्यव्वा बोलली, अशोक इराबत्ती, सुनीता पासकांटी यांच्यासह असंख्य विडी व यंत्रमाग कामगार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *