शाळा रंगविण्यात शिक्षक रंगले!

Big9news Network

सोलापूर महानगरपालिका शाळांच्या शिक्षकांनी शाळा रंगरंगोटीचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे.यासाठीचा खर्च कधी लोकसहभागातून,कधी नगरसेवक यांचे निधीतून तर कधी स्वतःच्या खिशातून केला जात आहे.

आपली शाळा सुंदर करणेकामी सध्या शहरातील शिक्षक रंगले आहेत. यामध्ये शिक्षक स्वतः शाळांना रंग देणे,शाळांमध्ये विविध आकर्षक चित्रांची निर्मिती करणे, रंगभरण करणे आणि अभ्यासाला उपयुक्त असणारे शैक्षणिक तक्ते तयार करणे असे काम मोठ्या प्रमाणात करीत आहेत.

शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागातून सोलापूर महानगर पालिकांच्या शाळा अधिक आकर्षक आणि अभ्यासपूरक बनत आहेत.यामध्ये महिला शिक्षिकांचा सहभाग उल्लेखनीय दिसून येत आहे.महापालिका शिक्षकांच्या या उस्फूर्त सहभागाबद्दल महापौर श्रीकांचना यन्नम,आयुक्त पि. शिवशंकर,उपायुक्त धनराज पांडे व प्रशासन अधिकारी कादर शेख यांनी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांचे अभिनंदन केले आहे.