नादच खुळा | खड्ड्याचे पुजन अन् पुढाऱ्यांच्या नावे विजयाच्या घोषणा ; भर रस्त्यात…

Big9news Network

कुरुल ते पंढरपूर ह्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणारा हा राज्य महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचे या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून ‘प्रयत्न चालू आहे’ इतकंच आश्वासन त्यांच्याकडून मिळत आहे. सद्यस्थितीला रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. अनेक वेळा प्रशासनाला कळवूनसुध्दा प्रशासनाने दखल घेतली नाही. म्हणून आज कुरुल व परिसरातील संतप्त नागरिकांनी उजनी बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सुहास घोडके यांच्या नेतृत्वाखाली कुरूल चौकातील पंढरपूर रोडवर असणाऱ्या खड्यामध्ये रक्तदान शिबीर आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

या रक्तदान शिबीरचे उद्घाटन बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या मुखवटा लावुन त्यांच्या हस्ते फित कापुन तर लिंगेश्वर निकम, बाबासाहेब जाधव, युवराज चौगुले, बापू जाधव, पांडुरंग बचुटे, युवराज शिंदे, दिपक गवळी, उमेश घोडके, महादेव धर्मशाळे, प्रशांत पाटील, प्रमोद वाघमोडे, प्रमोद लांडे, राजकर्ण घोडके, बापु सलगर, ॲड. विजयकुमार नागटिळक, शरद लोकरे, सिद्धेश्वर चव्हाण, बापु कोकाटे, गणेश चव्हाण, माधव चव्हाण, रणजित चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितत या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.


या महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे अपघाताची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अपघातांमध्ये शेकडो जण जखमी व अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. म्हणून लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी कुरुल चौकातील पंढरपूर रोडवर असणाऱ्या खड्ड्यांमध्ये घेतलेल्या या रक्तदान शिबीरात ७७ जणांनी सहभाग नोंदविला. रक्तदान शिबीर चालु असताना सोलापूर जि.प. अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, भीमाचे व्हाईस चेअरमन सतिश जगताप, जि.प.सदस्य शिवाजी सोनवणे यांनी रक्तदान शिबीर आंदोलनास पाठिंबा दर्शवत शासनाचा निषेध व्यक्त केला तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे गणेश क्षीरसागर यांनी भेट देवुन निवेदन स्विकारले व काटेरी झुडपे काढून खड्ड्यामध्ये मुरुम टाकुन खड्डे बुजविण्याचे काम सुरु करु असे सांगितले.

यावेळी नाना पाटील, मनोज जाधव, नानासाहेब ननवरे, विठ्ठल लामतुरे, विशाल वाघमोडे, बाळु जाधव, चिमाजी जाधव, माऊली माने, दत्ता खुणे, गणेश सरवळे, महेश जाधव, संतोष कुलाल, दिनेश सरवळे, विलास मोहिते, धनाजी जाधव, शेलार बचुटे, बंटी जगताप, बाळासाहेब नाईकनवरे, नागेश जगताप, विनायक घुले, आनंद पाटील, वैभव पाटकर, गणेश गुरव, प्रदिप फडतरे, सचिन गुरव, विशाल मासाळ, गणेश घोंगडे, संभाजी गोंधळी, सुशांत कोकाटे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले.

खड्ड्याचे पुजन अन् लोकप्रतिनिधींचे नावे विजय असो च्या घोषणा

साधारणपणे रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रतिमेचे पूजन करून केले जाते मात्र आज या ठिकाणी भल्यामोठ्या खड्ड्याचे पूजन वयोवृद्ध शेतकरी सौदागर भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते खड्ड्याला पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून करण्यात आले व त्यानंतर बांधकाम मंत्री अशोक चव्हाण लोकप्रतिनिधी आमदार यशवंत माने, आमदार बबनदादा शिंदे, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा ‘विजय असो’ अशा उपरोधिक घोषणा देण्यात आल्या.

… अन्यथा यापुढे उग्र आंदोलन करणार

– कुरुल पंढरपूर रस्त्याची दयनीय अवस्था ही गेल्या तीस-चाळीस वर्षापासूनची आहे जिल्ह्यातील सर्व प्रमुख महामार्गांचे दुहेरीकरण चौपदरीकरण झालेले असताना हा मार्ग लोकप्रतिनिधी कमकुवत असल्याने होऊ शकला नाही हे मोठं दुर्दैव आहे आज या रस्त्याच्या मागणीसाठी गांधीगिरी पद्धतीने रक्तदान शिबीर आंदोलन केले आहे लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा करून हा राज्य महामार्ग भक्तिमार्ग घोषित करून नूतनीकरण करावा अन्यथा येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करणार.