Big9news Network
केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी केंद्रांवरच उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १८ ते ४४ वयोगटासाठी कोविन प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केल्यामुळे लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळता आली. मात्र, लसींचे डोस वाया जाण्याचे प्रमाण विचारात घेता सरकारने या वयोगटासाठी वॉक-इन (Walk-In) लसीकरणासाठी परवानगी दिली आहे.
का घेतला निर्णय ?
ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरही काही डोस शिल्लक राहू शकतात. अशा स्थितीत डोस वाया जाउ नये यासाठी थेट लसीकरण केंद्रांवर येणाऱ्यांना लस दिली जाउ शकते.
मात्र, संबंधित राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करुन याबाबत अंतिम निर्णय घ्यावा.
त्याबाबत लसीकरण अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात यावे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, ही सुविधा केवळ सरकारी केंद्रांमध्येच उपलब्ध राहणार आहे.
तीन दिवसात सर्व राज्याना लसीचे डोस उपलब्ध करणार-
देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याकडे सद्य:स्थितीत कोरोनाप्रतिबंधक लसींचे १ कोटी ८० लाख डोस उपलब्ध असून, येत्या तीन दिवसांत सर्व राज्यांना लसींचे ४८ लाख डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली.
Leave a Reply