Big9news Network
हेल्पलाईन नंबर जाहीर; कुलगुरू डॉ. फडणवीस यांची माहिती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा 5 जुलै ते 21 ऑगस्ट 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने होत असून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. pahsu.org या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.
कोरोना आणि टाळेबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यापीठ परीक्षा विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले असून 5 जुलैपासून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. विविध अभ्यासक्रमांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या sudigitaluniversity.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी तीन मिनिटांची एक व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आली आहे. ती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. याचबरोबर हेल्पलाईन क्रमांक देखील जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, अशा सोप्या पद्धतीने ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी सोय विद्यापीठ परीक्षा विभागाकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाइल, लॅपटॉप, संगणकावरून ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. विकास कदम यांनी दिली.
विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी व पासवर्ड कॉलेजच्या मेलवर पाठवलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पासवर्ड मिळाला नसेल तर त्यांनी फॉरगेट पासवर्डवर क्लिक करून आपल्या मोबाईलवर पासवर्ड मिळवावे, अशी व्यवस्था पोर्टलवर करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेनुसार पोर्टलवर जाउन लॉगइन करावे. इतरवेळी त्यांनी पोर्टलवर जाऊन लॉगिन करू नये, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तांत्रिक अडचणीसाठी हेल्पलाईन क्रमांक
अमित- 8010093831, शुभम- 8010076657, अफजल- 8010083760, विनायक- 8010085759.
परीक्षेसंदर्भात हेल्पलाइन क्रमांक
मोटे- 8421905623, लटके- 8421238466, राजगुरू- 8421638556, धावारे- 8421068436, स्वामी- 8421528436, गायकवाड- 8421478451, आवटे- 8421401886, गायकवाड- 8421258436, मल्लाबादे- 8421488436.
Leave a Reply