जगावं की मरावं ! राष्ट्रवादीचे ‘गॅस’आंदोलन ,सोलापुरात रस्त्यावर..

Big9news Network

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटल व सर्व सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या आंदोलनाच्या सुरुवातीला महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर प्रतीकात्मक चूल मांडून त्यावर तवा आणि भाकर थापून तसेच दरवाढ केलेल्या गॅस सिलेंडर ला हार घालून केंद्रातल्या भाजपा सरकारचा निषेध केला. अच्छे दिन च्या नावाखाली केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकार मुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत, गेले दोन वर्ष देशात कोरोणामुळे जनतेचे हाल बेहाल होत असताना गेल्या महिन्यात इंधन दरवाढीने शंभरी गाठली असून काल पुन्हा एकदा सामान्य जनतेचे त्याहून बेकार हाल करत गॅस दरवाढ केल्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

नुकत्याच करण्यात आलेल्या गॅस दरवाढीमुळे सामान्य जनतेने जगावे की मरावे अशी हालत झाल्याने सदरचे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव यांनी 2012 च्या तुलनेत सध्या ची गॅस दरवाढ ही दुप्पट असल्याचे सांगत त्याकाळी सध्याच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आकांडतांडव करत रस्त्यावर चिरकत सरकारच्या विरोधात रस्त्यावर बसून आंदोलन केल्याची आठवण करून दिली परंतु त्याच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आता गप्प का? असा सवाल देखील शहराध्यक्षनी केला.

कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी देखील केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेत नुकत्याच करण्यात आलेल्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ प्रदेश कार्यालयातून आलेल्या आदेशा नुसार हे हे आंदोलन यापुढे देखील जर केंद्र सरकारने ही इंधन दरवाढ त्याचबरोबर गॅस दरवाढ कमी केली नाही तर याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.

रस्त्यावर प्रतीकात्मक चूल मांडून भाकरी थापत महिला शहराध्यक्षनि देखिल मोदी सरकारला इशारा देत महिलांचे घरातील बजेट कोलमडले असल्याचे सांगत आम्हाला असले नकली अच्छे दिन नकोत म्हणून सांगितले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या दुचाकी आंदोलनस्थळी ढकलत आणून निषेध नोंदविला.

सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चले जाव चले जाव भाजपा मोदी सरकार चले जाओ, धिक्कार असो धिक्कार असो केंद्र सरकारचा धिक्कार असो, अरे या सरकारचे करायचे काय.. खाली मुंडी वर पाय, इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे, मोदी सरकार हाय हाय, अब की बार शरद पवार.. अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनाच्या फलकाने वेधले लक्ष तसेच गॅस दरवाढीला कंटाळलेल्या घरच्या कर्त्या पुरुषाने सिलेंडरला पुष्पहार घालून मांडले आपले गाऱ्हाणे.
14 किलो चा घरगुती गॅस सिलेंडर मध्ये 25 रुपयांची वाढ करून सध्या प्रती गॅस सिलेंडर 845 रुपये असा भाव झाल्याने हेच का अच्छे दिन आणि तरी देखील तुम्ही आम्हाला निवडून दिल्याबद्दल मोदी सरकारने सामान्य जनतेला अच्छे दिन चा पुरस्कार देऊन आणखीनच कंबरडे मोडल्याचे प्रतिकात्मक चित्र फलका वरती झळकत होते.

आंदोलनाच्या शेवटी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना गॅस दरवाढ इंधन दरवाढ किराणा मालाचे भाव कमी झाले पाहिजेत अन्यथा ह्यापेक्षा तीव्र आंदोलन करू अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनाला सोलापूर शहर राष्ट्रवादीचे भारत जाधव, संतोष भाऊ पवार, शंकर पाटील, किसन जाधव, राजन भाऊ जाधव, जनार्दन कारमपुरी, जावेद खैरदी, बशीर शेख, सुनिता रोटे, लता ढेरे, आरती हुल्ले, संजय जाबा, मिलिंद गोरे, फकरुद्दीन वस्ताद, प्रमोद भोसले, सिद्धेश्वर आंबट, रुपेश भोसले, निशांत सावळे, आयुब पठाण, बसवराज कोळी, अशुतोष नाटकर, सोमनाथ शिंदे, आशिष जेटीथोर, मोहम्मद इंडीकर, अमीर शेख, हेमंत चौधरी, अनिल बनसोडे, विकी घाटंगरे, आकाश नरवडे, अमोल केळकर, मुकेश सांगळे, तनवीर गुलजार, नागेश बोराटे, नागेश निंबाळकर, सरफराज शेख, गब्बर सय्यद, युनूस मुर्षद, योगेश उबाळे, सफल क्षीरसागर, झिशान शेख, विक्रांत खुने, दिनेश पवार, अश्विनी भोसले, चित्रा कदम, ज्योती शटगार, मीनाक्षी कांबळे, सिया मुलाणी, सुनिता गायकवाड, शशिकला कस्पटे, उषा बेसरे, कविता पाटील, शोभा सोनवणे, सुनिता भरले, राजश्री ताई मोनिका सलगर आदी महिला तसेच संजू मोरे, बालाजी पवार, गणेश छत्रबंद, येशु मडरी, सरफराज बागवान, आफरीन पटेल, प्रशांत बाबर, दीपक राजगे, अजित पात्रे, विवेक फुटाने, अमोल कुलकर्णी, वसीम बुऱ्हान, श्रीनिवास कोंडी, वंदना भिसे, लक्ष्‍मण भोसले, महिपती पवार, रणजित बंने, सुयश गायकवाड, दत्ता वाघमोडे, अभिषेक बच्चल, ओम अंदेली, आदेश बनसोडे, शिवराज विभुते, प्रसाद खोबरे, गणेश पवार, शंकर पवार, मोमीन शेख, शाहरुख हूच्चे, अजिंक्य शिंदे, अरसलान शेख, ओम सपकाळ इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या आदेशानुसार तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे व पक्षीनिरीक्षक सुरेश अण्णा घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोलापूर जिल्हा परिषद समोरील पुनम गेट येथे केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या गॅस दरवाढीविरोधात जगावं की मरावं हे तीव्र निषेधात्मक आंदोलन करण्यात आले.