Big9news Network
सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 27 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 61 जण बरे झाले परंतु 1 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे.
सोलापूर शहरात आज शनिवारी दि.29 मे रोजी कोरोनाचे नवे 27 रुग्ण आढळले असून यामध्ये 17 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे.
आज एकूण 1949 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1447 निगेटिव्ह तर 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 61 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 1 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.