Big9news Network
आज दि.29 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 801 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.
आज गुरुवारी 29 मे रोजी ग्रामीण भागातील 801 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 466 पुरुष तर 355 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1379 आहे. यामध्ये 813 पुरुष तर 566 महिलांचा समावेश होतो. आज 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 7638 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 6837 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.