Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Mh13news Network

बनावट दस्तऐवज व सह्या करून मुरारजी पेठेतील जुनी मिल चाळीतील घरावर कब्जा केल्याप्रकरणी चेअरमन सेक्रेटरीसह तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुनी मिल चाळीचे चेअरमन, सेक्रेटरी, कविता कोकाटे (सर्व रा.सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घराचे मालक रामचंद्र विठ्ठल वाघमारे यांचे निधन झाले आहे. कविता कोकाटे यांनी रामचंद्र वाघमारे यांना वारस असताना त्यांच्या घराचे बनावट दस्तऐवज तयार केले. रामचंद्र वाघमारे यांच्या चार बहिणी व तीन भाऊ असे वारसदार असताना त्यांची संमती न घेता घरावर कब्जा करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. रामचंद्र वाघमारे यांची मुलगी रुक्मिणी सिद्धाराम जमादार (वय ४४, रा. झोपडपट्टी नंबर 2 हनुमान मंदिराशेजारी, विजापूर नाका) या घर परत मागण्यासाठी गेल्या असता कविता कोकाटे यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली.

त्यानंतर रुक्मिणी जमादार यांनी चेअरमन व सेक्रेटरी यांच्याकडे विचारणा केली असता तेथे त्यांना रामचंद्र वाघमारे व वारसदार सिद्राम जमादार नसताना त्यांचे संमतीपत्र न घेता सभासदत्व रद्द केले. घर कविता कोकाटे यांच्या ताब्यात दिले, अशी फिर्याद रुक्मिणी जमादार यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक बरगुडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *