आता..सुरू पाहणी CEO विना | स्मार्ट सिटीच्या कामाची महापौर, सभागृहनेते, आयुक्त…

Big9news Network

स्मार्टसीटीच्या माध्यमातून सुरू असलेले सिद्धेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम, लक्ष्मीमार्केट येथील सुरू असलेले काम आणि पार्क स्टेडियमच्या कामाची पाहणी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, आयुक्त पी.शिवशंकर, यांनी केली. लक्ष्मी मार्केट येथील सुरू असलेल्या कामाची पाहणी करत असताना नागरिकांनी आपल्या येत असलेल्या समस्या महापौरांसमोर मांडल्या येत्या काळात लवकरच समस्या मिटिंग घेऊन आम्ही सोडवणार काहे. सिद्धेश्वर मंदिर येथे परिसरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या ठिकाणी काही त्रुटी आढळून आले आहे त्याची पाहणी करण्यात आली व पार्क स्टेडियम हे लवकरच सुरू करावे अशी प्रतिक्रिया महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.

ईबीडी भागातील लक्ष्मी मार्केट, सिद्धेश्वर मंदिर सुशोभिकरण आणि पार्क स्टेडियमचे काम हे काम कोणत्या स्टेजवर सुरू आहे याची पाहणी करावी अशी मागणी सभागृहनेत्यांनी केली होती. त्याची दखल घेत आज पाहणी करण्यात आली. पार्क स्टेडियम येथे काम हे अंतिम टप्प्यात आहे लवकरात लवकर या स्टेडियमवर मॅचेस सुरू करावेत, सिद्धेश्वर मंदिर परिसरातील कामे हे संथ गतीने सुरू आहेत. स्मार्ट सिटी चे जे काही प्रकल्प सुरू आहेत त्याचा आढावा दर दहा दिवसाला आयुक्त साहेबांनी घ्यावा असे मत सभागृहनेते यांनी मांडली तसेच लक्ष्मी मार्केट येथील नागरिकांनी समस्या मांडल्यानंतर तत्काळ आपल्या समस्या मिटिंग घेऊन सोडवण्यात येथील असे अश्वासन सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी दिले.

यावेळी स्मार्ट सिटी चे काम सुरू असलेल्या ठिकाणी काही त्रुटी आढळून आल्या आहेत त्या त्रुटी संदर्भात महापौर यांच्या समवेत बैठक घेऊन त्या अनुषंगाने सोडवण्यात येईल व काम चांगल्या पद्धतीने करण्यात येईल अशी माहिती आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली.

यावेळी नगरसेवक नागेश भोगडे, सहायक आयुक्त विक्रम पाटील, नगरअभियंता संदीप कारंजे, क्रीडा अधिकारी नजीर शेख, झोन अधिकारी सारिका अकुलवार आदीजन उपस्थित होते.