Big 9 News Network
शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी
ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यातच तालुक्यातील बहुतांशी रुग्णालये उपचार घेणाऱ्या रुग्णांमुळे फुल्ल झाली आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे तर दुसऱ्या बाजूला व्हेंटिलेटर,बेडची कमतरता भासत आहे. आज पासून सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अधिकारी वर्ग ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फिरत आहेत.
आज शुक्रवारी दि. 23 एप्रिल रोजी माढा तालुक्यात तब्बल 302 रूग्ण वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रूग्णालयातून बरे होऊन 98 जण घरी गेले आहेत. आज माढा तालुक्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
या गावात रूग्ण वाढ –
माढा 11 , कुर्डुवाडी 20,टेंभुर्णी 21, सापटणे (टे)10, पिंपळनेर 11,वरवडे 11, भेंड 10,जामगाव 14, कव्हे 3, बारलोणी 2, महादेववाडी 6,अकुलगाव 1,लव्हे 1,भोसरे 2,घाटणे 2,मानेगाव 7,चव्हाणवाडी (के)1,कापसेवाडी 1, हटकरवाडी 3, बुद्रुकवाडी 1,अंजनगाव (उ)1,खैराव2,दारफळ 6,निमगाव (मा)3, महातपुर 1, वडाचेवाडी (उबु)6,उपळाई (खु)1,रोपळे (खु)1,विठ्ठलवाडी 1,चिंचोली 3,वडशिंगे 1,तडवळे 1,वडाचेवाडी (तम)3,वेताळवाडी 3,मोडनिंब 7, जाधववाडी( मो) 5 , तुळशी 9, अरण 2, पडसाक 4,बावी8, लऊळ 5, परिते 6, परितेवाडी 2, घोटी 1,अकोले (बु)1, व्होळे 2 ,आहेगाव 4, भुईजे 1,उजणी (मा)2,पालवन 5,निमगाव (टे)3, तांबवे 5,उपळवटे 6, बादलेवाडी 2, पिंपळखुंटे4, आंबाड 3,कुर्डु 6,भोगेवाडी 7,अकोले (खु) 8, दहीवली 2,कन्हेरगाव 3 ,शेवरे 2, सोलंकरवाडी 1, मानेगाव 2, आलेगाव( बु)1,आढेगाव 6,शिराळ (टे)2, टाकळी( टे)2,रांझणी 2,
मयत व्यक्ती या गावातील
कुर्डुवाडी 1 स्ञी, मानेगाव 1 स्ञी.
आजपासूनच गाव तिथे covid सेंटर या भूमिकेतून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शंभर गावांमध्ये येत्या दोन दिवसात कोव्हिड केअर केंद्र उभारणार असल्याची माहिती सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.
- पाच हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत आढावा घेऊन त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत नियोजन केले आहे. त्यानुसार पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायत स्तरावर गाव तिथे covid केअर सेंटर सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सुयोग्य असे सार्वजनिक ठिकाण निश्चित करून निश्चित करून 25 ते 50 क्षमतेच्या खाटांची क्षमता असलेले कोविड सेंटर दोन दिवसात सुरू करणेबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना आदेश दिलेला आहे. माढा तालुक्यातील नऊ ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर उभे केले जाईल.
दिलीप स्वामी. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. सोलापूर