काळजी घ्या | ग्रामीण भागात तब्बल 1302 कोरोना बाधित रुग्ण

आज दि.23 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1302 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

एकाच दिवशी 19 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.

आज शुक्रवारी 23 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 1302 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 798 पुरुष तर 504 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 889 आहे. यामध्ये 575 पुरुष तर 314 महिलांचा समावेश होतो. आज 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 10536 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 9234 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.