Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

MH13 NEWS Network

माझी वसुंधरा अभियानानिमित्त उमरड करमाळा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक बैठक माझी वसुंधरासाठी या उपक्रमाचा शुभारंभ सीईओ स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी माझी वसुंधरा अभियान, कोविड लसीकरण जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरी मध्ये बैलगाडीला जनजागृतीचे बॅनर पोस्टर लावून ही बैलगाडी फिरवण्यात आली.

ग्रामस्थांच्यावतीने दिलीप स्वामी यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली व ग्रामस्थांच्या आणि शाळेच्या वतीने त्यांचा व मान्यवरांचा पुस्तक आणि गुलाबाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. प्रभात फेरी मध्ये उमरड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी सामील होते.
याप्रसंगी सीईओ स्वामी यांनी गाव कारभारी व ग्रामस्थांना कोविड लसीकरण तसेच माझी वसुंधरा अभियानात वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले. सीईओ स्वामी यांनी सुरू केलेल्या एक पद एक वृक्ष अभियानाअंतर्गत लावलेल्या वृक्षांची पाहणी सीईओ स्वामी यांनी केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरड येथील स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत झालेल्या कामांची पाहणी, शाळेतील सायन्स वॉल, संगणक कक्ष, अन्नपूर्णा मंदिर, परसबाग पाणी सुविधा, हॅन्ड वॉश स्टेशन, औषधी वनस्पतींची लागवड, सेल्फी पॉइंट इत्यादी बाबींची पाहणी करून स्वामी यांनी समाधान व्यक्त केले.


गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तालुक्यातील पहिल्या सायन्स वॉलचे उद्घाटन सीईओ स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सायन्स वॉल म्हणजे शाळेच्या एका भिंतीवर विविध शास्त्रज्ञांचे प्रतिमा रंगवण्यात आलेल्या आहेत. शास्त्रज्ञांच्या जन्मदिना दिवशी शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन त्या शास्त्रज्ञांचे अभिवादन करतील व त्या शास्त्रज्ञांविषयी त्याने लावलेल्या शोधाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देतील. सायन्स वॉल सारख्या अभिनव उपक्रमांची आज नितांत गरज असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अशा उपक्रमांद्वारे भर पडणार आहे. हा उपक्रम राबविल्याबद्दल मी मनोज राऊत यांचे मनस्वी अभिनंदन करतो व जिल्ह्यातील इतर शाळांनी या उपक्रमाचे अनुकरण करावे असे आवाहन करतो असे प्रतिपादन सीईओ स्वामी यांनी यावेळी केले.


शाळेच्या प्रगतीसाठी ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवून शिक्षकांना प्रेरणा व प्रोत्साहन द्यावे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत शाळेने स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तसेच गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू मुक्त शाळा अभियानात शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सीईओ स्वामींनी शिक्षकांचे व ग्रामस्थांचे अभिनंदन व कौतुक केले.
उमरेड येथील कार्यक्रमानंतर पंचायत समिती करमाळा येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ईशाधीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, मनोज राऊत गटविकास अधिकारी करमाळा, राजाराम भोंग गटशिक्षणाधिकारी करमाळा, वामनराव बदे, माजी जि.प सदस्य, राजश्री चोरमुले सरपंच, प्रमोद बदे माजी सरपंच, लालासाहेब पडवळे, डी.जी.बदे संदिप मारकड ग्रा.पं.सदस्य, अंकूश कोठावळे पोलिस पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *