MH13 NEWS Network
माजी काँग्रेस नेते आणि खजिनदार सुधीर खरटमल यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. लष्कर येथील बेरिया हॉलमध्ये झालेला हा प्रवेश कार्यक्रम सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर तथा नगरसेवक महेश कोठे, नगर सेवक तौफीक शेख, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, लता ढेरे, अजमल शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.वाढदिवसादिवशीच आमदार प्रणिती शिंदे यांना राष्ट्रवादीने दुसऱ्यांदा जोर का झटका दिलाय अशी चर्चा रंगली होती.
शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात महेश कोठे यांनी सुधीर खरटमल यांना राष्ट्रवादीमध्ये घेत काँग्रेसला मोठा झटका दिला होता. त्याच वेळी खरटमल यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर आ. प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे 9 डिसेंबर रोजी खरटमल यांच्या सुमारे 200 समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये शहर मध्यमधील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
यावेळी बोलताना कोठे म्हणाले की, कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे निष्ठावंत अन्वर अन्याय होत आहे खरटमल यांच्यावरही काँग्रेस पक्षाने अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरील निष्ठा कायम ठेवत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खरटमल ज्याप्रमाणे तुम्हाला काँग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक देत होते, त्याचप्रमाणे तुम्हाला राष्ट्रवादीतही वागणूक मिळेल असा विश्वास यावेळी कोठे यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सुधीर खरटमल यांचेही भाषण झाले. यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष जावेद शिकलकर, गोविंद कांबळे, रोहित खिलारे, उपाध्यक्ष सोपान थोरात, सोलापूर महानगरपालिका माजी शिक्षण मंडळ सदस्य विठ्ठल होनमारे, सूर्यकांत शेरखाने, , मौला चॉंदा, प्रभाकर सोनगीवाले, वैभव वाडे, तन्वीर मणियार, स्वप्निल गायकवाड, अन्वर बागवान, काँग्रेसचे सचिव द्वारकाप्रसाद तावनिया, राहुल गांधी विचार मंचचे शहराध्यक्ष शक्ती कटकधोंड, मोची समाजाचे रथोत्सव अध्यक्ष प्रवीण वाडे, काँग्रेसच्या महिला प्रभाग अध्यक्ष सुनंदा होटकर, युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष युवराज पंतुवाले, सागर होटकर, निलेश होटकर, कृष्णा धुळराव, राजू कोरे, हिमाद शेख, रवींद्र शिंदे, अण्णा पवार, करेप्पा जंगम, सनी मेह्त्रे, गौरव पात्रे अशोक आयगोळे, वनिता गिरी, मंजू चव्हाण, प्रीती बंतल, समीरा शेख, परवीन सिंदगीकर, कांचन पवार, आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला.
काँग्रेसमध्ये जी पदे तीच पदे राष्ट्रवादीतही देणार: कोठे
खरटमल यांच्यावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येईल. काँग्रेसमध्ये जी पदे होती तीच पदे या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये देण्यात येतील, असेही यावेळी महेश कोठे यांनी सांगितले.