Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9news Network

सोलापूर जिल्हा परिषद यांच्या एक पद एक झाड या उपकामांतर्गत भारतीय स्टेट बँक, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय यांनी आपला सहभाग नोंदवत जिल्ह्यातील ४६ शाखांतर्गत आज दि. ०६.०७.२०२१ रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम विविध शशकिया आस्थापन यांचा सहभाग नोंदवत सुरू केला.

या कार्येक्रमाचे उद्घाटन, भारतीय स्टेते बँक बळीवेस येथे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री. दिलीप स्वामी यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हा परिषद चे मुख्य लेखा अधिकारी श्री. अजय पवार व भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय व्यवस्थापक, श्री. राजीव गुप्ता, हे उपस्थित होते.

या कार्येक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री दिलीप स्वामी यांनी विचार व्यक्त करताना भविष्यातली पर्यावरण संवर्धंनाची आव्हानं व त्याच्यावर करायच्या उपाययोजना, याचा आढावा घेतला व याच अंतर्गत जिल्हा परिषदेच्या २०००० कर्मचार्‍यांच्या वतीने, प्रत्येकी एक झाड  ते जगविण्याचे संकल्प सोडला आहे व या उपक्रमाचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याचे लेखा परीक्षण केले जाईल असे सांगितले.

या कार्येक्रमप्रासंगि भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक, श्री राजीव गुप्ता यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या उपक्रमात सर्व शाखांना सहभागी करून एक पद एक झाड या उक्ती प्रमाणे, ४५० झाडं लावण्याचा संकल्प सोडला आहे.

या कार्येक्रमासाठी, मुख्य प्रबंधक, सौ. सोनिया अत्री यांचे मार्गदर्शन लाभले. कार्येक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुहास कुलकर्णी यांनी केले व हा करयेकरम यशस्वी होण्यासाठी श्री. धनंजय होनमाने, श्री, विजयसिंह पाटील, श्री. सोमनाथ माने, श्री. गौरव कल्याणकर यांनी आपला सभाग नोंदवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *