Big9news Network
जागतिक महामारी म्हणून थैमान घातलेल्या कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून पंढरपूरच्या चारही वारी भरू शकल्या नव्हत्या. त्यामुळे वारकरी सांप्रदायामध्ये उत्साह पहावयास मिळत नव्हता. अखिल भाविक वारकरी मंडळाच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून शासनाने सोमवार दि.15 नोव्हेंबर रोजी होणार्या कार्तिकी वारीस परवानगी दिल्याने अखिल भाविक वारकरी मंडळाने पेढे वाटून हा आंदोत्सव साजरा केला आहे.
याप्रसंगी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांनी उपस्थित वारकर्यांना एकत्रित आणून पेढे भरवून हा आनंद उत्सव साजरा केला.
याप्रसंगी ह.भ.प.सुधाकर इंगळे म्हाराज प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे ही वारी बंद होती. या वारीला परवानगी मिळावी म्हणून अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्री या वारीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय व इतर दालनासमोर वेळोवेळी भजन आंदोलने, निवेदने देवून ही वारीस परवानगी द्यावी म्हणून धडपड चालू ठेवली होती. त्यांनी मुंबई येथे आपल्या सहकार्यासोबत आझाद मैदान येथेही आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच त्यांनी गेल्या आषाढी वारीसाठी परवानगी मिळावी म्हणून आळंदी ते पंढरपूर अशी पायी येवून आंदोलन केले. आंदोलनादरम्यान त्यांना पुणे नजीक पुणे पोलसांनी परवानगी नाकारून त्यांना अटक ही केली होती. परंतू त्यांनी खचून न जाता वैष्णवांचा मेळावा हा भरलाच पाहिजे. यासाठी सतत आंदोलने करून अखेर या कार्तिक वारीसाठी परवानगी मिळाली. हा आनंदोत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकार ही फक्त अखिल भाविक वारकरी मंडळाला असल्याचे ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज म्हणाले. अखिल भाविक वारकरी मंडळाच्या प्रयत्नाला यश आल्याने त्यांनी रविवारी अखिल भाविक वारकरी मंडळीसोबत पेढे भरवून हा आनंदोत्सव साजरा केला आहे.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय सचिव ह.भ.प.बळीराम जांभळे महाराज, जिल्हाध्यक्ष ह.भ.प.जोतीराम चांगभले, सहजिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर भगरे, मंगळवेढा शहर उपाध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष ह.भ.प.निलेश गुजरे, ह.भ.प.मल्लिकार्जून राजमाने, ह.भ.प.कृष्णा चवरे, ह.भ.प. गुरूसिद्ध गायकवाड, कामतीचे ह.भ.प.भिमराव भोसले, ह.भ.प.दाजी भोसले, यांच्यासह अखिल भाविक वारकरी मंडळाचे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.