पद्मशाली समाज बांधवांसाठी स्नेह बंधन

Big9news Network

दिवाळीच्या औचित्य साधून श्री जय मार्कंडये सोशल फाउंडेशनच्या वतीने पद्मशाली समाज बंधू-भगिनी साठी दिपावली फराळ, स्नेहबंधन व समाजातील एकता अखंड राहण्याकरिता आज पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय मंदिर सिद्धेश्वर पेठ येथे स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमाची सुरुवात सोलापूरचे महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते श्री मार्कंडये महामुनीची आरती, नक्षत्र पूजा करण्यात आले. या कार्यक्रमास पद्मशाली समाजाचे अध्यक्ष महेश कोठे, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे गणेश पेनगोंडा, ज्येष्ठ विधिज्ञ रामदास सब्बन, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी तसेच समाजबांधव यावेळी उपस्थित होते.