Big 9 News Network
लाॅकडाऊन शिथिल करून व्यापाऱ्यांना आपली दुकाने सुरू करण्यासाठी व म्युकरमायकोसिस उपचारा संदर्भात महात्मा फुले योजनेची अंमलबजावणी तसेच महा-ई-सेवा केंद्र चालू करण्याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन
लाॅकडाऊन मुळे अनेक दिवस व्यापारी दुकाने बंद आहेत त्यामुळे व्यापारी खूप अडचणीत आहेत प्रचंड अर्थिक नुकसान होऊन रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तरी सोलापूर शहरात कोरोना संसर्ग कमी होत आहे कोरोनाचे नियम व अटी घालून व्यापारीना त्यांची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच जाहीर केल्याप्रमाणे म्युकर मायकोसीस रोगाच्या मोफत उपचार बाबतीत आदेश जाहीर केल्याप्रमाणे सामान्य रुग्णांना न परवडणारा उपचार मोफत करण्या संबंधी योजना जास्तीत जास्त रूग्णालयात लागू करावी असे आदेश द्यावेत . अशी मागणी राष्ट्रवादीसह इतर राजकीय पक्षांनी केली.
तसेच सध्याच्या परिस्थितीला रिक्षा चालक अनुदान, शेतीविषयक, विद्यार्थी परीक्षा या करिता ऑनलाईन नोंदणी ची अवश्यकता आहे व इतर शासकीय योजना बाबतीत शासकीय अर्ज भरावयाचे असल्या कारणामुळे बंद असलेले शहर व जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्र सुरु करण्याबाबत आदेश द्यावेत.असे निवेदन देण्यात आले पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार भाजपाचे जेष्ठ नगरसेवक सुरेश पाटील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यावेळी राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, सोशल मीडिया शहराध्यक्ष प्रमोद भोसले, शहर चिटणीस ज्योतिबा गुंड, अय्युब पठाण, श्याम भाऊ गांगर्डे आदी उपस्थित होते.
Leave a Reply