Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

Big9news Network

सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 53 जण बरे झाले व आज एकही मृत्यू झाला नाही.

सोलापूर शहरात आज शनिवारी दि.5 जून रोजी कोरोनाचे नवे 15 रुग्ण आढळले असून यामध्ये 7 पुरुष तर 8 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 2227 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1783 निगेटिव्ह तर 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 53 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज एकही जणांचा मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *