सोलापूर | तब्बल दहा हजार पात्र लाभार्थ्यांना गृहकर्जासाठी घरांची लॉटरी

Big9news Network

पंतप्रधान आवास योजना अंतर्गत जगातील सर्वात मोठे अभिनव असे एकमेव सोलापुरातील 30000 असंघटित कामगारांचे पथदर्शी महत्वकांशी गृहनिर्माण प्रकल्प रे नगर मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर च्या वतीने आज नऊ ऑगस्ट रोजी हस्तांतरित करण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजना अभियानांतर्गत अंतिम मंजुरी मिळालेल्या घरकुलांची गृहकर्जासाठी लॉटरी (सोडत)आज होणार आहे. अशी माहिती रे नगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिली

आज रविवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता गटनंबर 722 दोडी रोड रे नगर मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे प्राथमिक स्वरूपात वितरित सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर येणार असून कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून पहिल्या टप्प्यातील दहा हजार पात्र लाभार्थ्यांच्या घराची सोडत होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.