सोलापूर | अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संतोष धोत्रे

Big9news Network

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संतोष धोत्रे यांची सातारा हून बदली झाली आहे.
तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांची नाशीक येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची
बदली झाले नंतर त्यांचे रिक्त पदावर संतोष धोत्रे यांची बदली झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री संतोष धोत्रे यांनी प्रभावी पणे काम केले आहे.अॅग्रीकल्चरल मघ्ये पदवीधर असलेले संतोष धोत्रे यांनी २००१ व २००२ मध्ये महसुल विभागा मध्ये काम केले आहे. नाशीक व नगर येथे परिविक्षाधिन अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर सोलापूर, धुळे व सिंधूदुर्ग येथे त्यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले. तत्कालीन पर्यावरण मंत्री यांचे ते खाजगी सचिव म्हणून मंत्रालयात काम केले आहे. सन २०१५ मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती मिळाले नंतर जालना येथे ३ वर्षे व त्या नंतर सातारा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहत होते.

सोलापूर येथील कामाचा त्यांना दिर्घ अनुभव आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. किटकनाशके व फळांवरील अवशेष परिणाम यावर त्यांनी शोधनिबंध लिहिला आहे. २००३-४ मध्ये मगर जिल्हयात काम करीत असताना पाथर्डी येथील पाणी टंचाई आराखडा व त्यांची अंमलबजावणी हा पथदर्शी प्रकल्प ठरला. सोलापूर येथे कार्यरत असताना शासनाने वाढीव पदाचे निर्मिती बाबत नेमणूक आलेल्या राज्यस्तरीय समिती मध्ये त्यांनी काम केले आहे. धुळे येथे पाणी गुणवत्ता व सनियंत्रण या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे त्यांची राज्य स्तरीय अभ्यास गटात निवड झाली होती. २०१३-१४ मध्ये राजीव गांधी प्रशासकीय अभियाना मध्ये सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. जालना येथे जलयुक्त शिवार योजना प्रभावी पणे राबविली आहे. सातारा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मध्ये सातारा जिल्हा परिषदेला स्वच्छतेचा देशांतील पहिला क्रमांक मिळाला. सातारा जिल्हा परिषेदेचा गौरव देशांचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे हस्ते करणेत आला. सन २०१९ व २०२०-२१ मध्ये पंडित दिनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. माण व खटाव या दुष्काळी भागात जानावरांचे छावणी व दुष्काळ निवारणाचे काम केले आहे.

काम करणेची सकारात्मक पध्दतीमुळे प्रशासकीय कामात गतीमानता आणण्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची ख्याती आहे. काटेकोरपणा, वेळेचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी यामुळे श्री धोत्रे यांनी प्रभावीपणे काम केले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.