स्वामी भक्तीमुळे भावार्थ समजतो –  मदन मुकणे

Big9news Network

येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान तसेच श्री स्वामी समर्थांचे महात्म्य व महती खूप मोठी आहे. स्वामी समर्थां वरील श्रद्धेमुळे अनेक भाविक स्वामी भक्तीच्या माध्यमातून अक्कलकोटी येत असतात. आपणही श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त असून स्वामी भक्तीमुळे व  भक्तीतून येणाऱ्या प्रचितीमुळे भक्तीतला भावार्थ समजतो असे मनोगत सोलापूर कृषी विभागाचे उपसंचालक मदन मुकणे यांनी व्यक्त केले.

ते नुकतेच सपत्नीक येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी प्रशिक्षक नंदकिशोर भोसले, सतीश ढगे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, रवी मलवे, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.