ओसवाल फायनान्सने पटकावली सुर्या कार्पोरेट ट्रॉफी; श्रीराम ट्रान्सपोर्ट संघ उपविजेता

Big9news Network

चौकार षटकारचा पाऊस पाडून धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या ओसवाल फायनान्सने श्रीराम ट्रान्सपोर्टच्या संघाला नमवून यंदाच्या 10 व्या वर्षातील सुर्या कार्पोरेट ट्रॉफीवर आपले नाव कोरले. प्रमुख अतिथी प्रसिध्द अस्तिरोग तज्ञ डॉ. अभिजित वाघचवरे, सन्मित्र डेव्हलपर्सचे अनिकेत कलशेट्टी, निर्मल डेव्हलपर्सचे जयश संगा, शशिकांत टाकळीकर, सुर्या ग्रुपचे अध्यक्ष राजकुमार सुरवसे, संजय सुरवसे,मनोज भागवत यांच्या हस्ते विजेत्या ओसवाल फायनान्सच्या क्रिकेट संघाला सुर्या कार्पोरेट ट्रॉफी तसेच 25 हजाराचे रोख बक्षिस देवून सन्मान करण्यात आला. स्वर्गिय लिंगराज वल्याळ मैदान येथे घेण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेला क्रिकेट प्रेमिंनी मोठ्यासंख्येने गर्दी केली होती.

सुर्या ग्रुपच्या वतीने गेल्या 9 वर्षापासून सुर्या क्रिकेट कार्पोरेट ट्रॉफी घेण्यात येते यंदाचे हे 10 वे वर्ष असून दि. 11 डिसेंबर ते 25 डिसेंबर या दरम्यान हे सामने घेण्यात आले यामध्ये बँक ऑफ इंडिया, जनता बँक, आयसीआयीसी बॅक, कोटक बँक, एचडीबी बँक, जलसंपदा, भूजल विभाग, न्यायालय कर्मचारी, सोलापूर महानगर पालिका, अश्विनी हॉस्पिटल, भारतीय स्टेट बँक अशा कार्पोरेट क्षेत्रातील एकूण 26 क्रिकेट संघानी सहभाग घेतला होता. दर शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी हे सामने खेळवले जात होते.

सुर्या कार्पोरेट ट्रॉफीचा पहिलाच उदघाटनाचा सामना अत्यंत रोमहर्षक झाला. बँक ऑफ इंडिया विरूध्द एमएसईबी संघात झाला. दोन्ही संघाने सामना बरोबरीत ठेवला परंतु सुपर ओवरमध्ये बँक ऑफ इंडियाने बाजी मारली. तर अंतिम सामन्यात श्रीराम ट्रान्सपोर्ट विरूध्द मोतीलाल ओसवाल फायनान्स यांच्यामध्ये सामना झाला यामध्ये श्रीराम ट्रान्सपोर्ट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 8 ओवर मध्ये 5 गडी गमावून 105 धावा केल्या. त्यानंतर मोतीलाल ओसवाल फायनान्स संघाने 105 धावांचे लक्ष्य अवघ्या 6 ओवर 2 बॉलमध्ये केवळ 1 गडी गमावून तब्बल 109 धावा काढत सुर्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. अंतिम सामन्याचे सामनावीर म्हणून राहूल फर तर उत्कृष्ठ गोलदाज म्हणून सत्यजित कांबळे, उत्कृष्ठ फलंदाज म्हणून राहूल सोनवणे तसेच संपूर्ण सुर्या ट्रॉफीचे मॅन ऑफ दि सिरीज म्हणून राहूल सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला.

मोतीलाल ओसवाल फायनान्स संघ हा सुर्या कार्पोरेट ट्रॉफी मध्ये प्रथमच सहभागी झाला होता आणि त्यांनी सुर्या ट्रॉफी जिंकली हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोतीलाल ओसवाल फायनान्स संघाला सुर्या कार्पोरेट ट्रॉफी तसेच सन्मित्र डेव्हलपर्स कडून रोख 25 हजार रूपये देण्यात आले तर उपविजेत्या श्रीराम ट्रान्सपोर्ट संघाला ट्रॉफी तसेच निर्मल डेव्हलपर्सकडून 11 हजार रोख बक्षिस देण्यात आले.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून वरूण बुर्ला, अजय जाधव यांनी तर स्कोरर म्हणून रितेश कुलकर्णी आणि खेळाडू तसेच उपस्थित क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम समालोचक म्हणून शंकर पवार यांनी चांगली कामगिरी बजावली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुर्या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सुरवसे यांच्या नेतृृत्वाखाली संजय सुरवसे, जयराम मडीवाळ, आप्पा रामदासी, स्वरूप स्वामी, ज्ञानेश्वर लिंबोळे, काशिनाथ औरसंग, विजय कोनापुरे, राजन चिंचोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.