‘त्या’ विवाहितेच्या बलात्कार प्रकरणी सोलापुरातील आरोपीस…

Big9News Network

हुलजंती, (ता. मंगळवेढा) येथे राहणाऱ्या एका महिलेवर बिरप्पा सोमुते नामक तरुणा कडून बलात्कार केले प्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन पंढरपूर येथील मे. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कमला बोरा यांनी आज मंजूर केला.
यात हकीकत अशी की

आरोपी बिरप्पा सोमुते (वय २६) याने पीड़ित विवाहित महिलेला जीवे मारण्याचा धाक दाखवून जबरस्तीने शरीर संबंध ठेऊन बलात्कार करून, व्हिडीओ कॉल करून,तिला नग्न होणेस भाग पाडुन,तिचे नग्न व्हिडिओ बनवून ,पीडित महिलेच्या पतीस पाठविले व तसेच संमती नसताना पीडित महिलांचे आधार कार्डवर सुद्धा आरोपीने आपला नाव लावला अशी फिर्याद आरोपी विरुद्ध मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे नोंद झाली होती.

त्या प्रकरणी आरोपीने ऍड. मंजूनाथ कक्कळमेली याचे कडून अटकपूर्व जामीन साठी मे. कोर्टा पुढे जामीन अर्ज ठेवला होता.

यात आरोपी तर्फे युक्तिवाद करताना “आरोपी हा पीडित महिले पेक्षा ६ वर्षांनी लहान आहे. फिर्याद ६ महिने उशिरा दाखल झाले आहे. तसेच आरोपीचे व पंडित महिलेचे २०२० पासून प्रेम संबंध आहेत. फिर्यादी मध्ये कोठेच तिच्या इच्छा विरुद्ध शरीर संबंध ठेवले याचा उल्लेख नाही. दोघांमधील शरीर संबंध हे सहमतीने होते, पीडित पाहिले सोबत केलेले व्हिडिओ कॉल्स हे सुद्धा संमतीने केलेली आहेत, याची माहिती पीडित महिलेच्या पतीस व पित्यास सुद्धा माहिती आहे. आरोपीस गुन्हात मुद्दामहून गुंतवलेले आहे. दिलेल्या फ़िर्यादी मध्ये काही तथ्य नाही” असे युक्तिवाद ऍड. कक्कलमेली यांनी केले असता मे. कोर्टाने ते ग्राह्य धरून आरोपीस३०,००० च्या जातमूलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केले.

इतकेच नव्हे तर मे. कोर्टाने प्रथम दर्शनी घटना हे सहमतीने, बलात्काराचा आरोप होईल की नाही याबाबत शंका असल्याचा टिप्पणी देखील सत्र न्यायालयाचा जामीन अर्जावरील निकालात केली आहे.

यात आरोपी कडून ऍड.मंजूनाथ कक्कळमेली यांनी काम पाहिले तर सरकार पक्षा कडून ऍड. सारंग वांगीकर तर मूळ फिर्यादी कडून ऍड.उल्हास माने यांनी पहिले.