भाजपचे आ. आशिष शेलार यांची हेरिटेज लॉन्स येथील आयोजित केलेली पत्रकार परिषदे रद्द करण्यात आली आहे अशी माहिती भाजपच्या नेत्यांनी दिली.
सोलापूर – भाजपाचे मुख्य प्रतोद माजी मंत्री आमदार ॲड. आशिष शेलार यांची आजची हेरिटेज लॉन्स येथील पत्रकार परिषदे रद्द झालेली आहे. मुंबईहुन पक्षनेतृत्वाने सध्याच्या काही राजकिय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर तातडीने बोलावल्याने अक्कलकोट येथून मुंबईकडे सकाळीच रवाना त्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द झालेली आहे यासंदर्भात आ.आशिष शेलार व भाजपचे अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वापरलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे राज्यभर शिवसैनिकांमध्ये संताप पसरला आहे.ठीकठिकाणी आंदोलने केली जात असून या पार्श्वभूमीवर सोलापुरातही आज सकाळी आंदोलन करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद रद्द झाल्याचे समजते.