मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक करण्यात आली. त्यांचा बीपी आणि शुगर वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल असे मत त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अनुउदगार काढणाऱ्या तसेच जनआशीर्वाद यात्रे निमित्तानं विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेल्या, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना आता काही वेळापूर्वी रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याआधी रत्नागिरी कोर्टात राणे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळं राणे यांच्या विरोधात राज्यभर शिवसैनिक रस्त्यावर उतरून आज आंदोलन करत होते. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक व्यक्तव्य विरोधात संपूर्ण राज्यात शिवसैनिकांनी संताप व्यक्त करून जहरी टीका केली आहे.
राणे नेमंक काय म्हणाले होते.?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली चूक सुधारली.ते म्हणाले की “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”,. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक प्रहार केला होता. त्यामुळे शिवसैनिकांनी डायरेक्ट सामना केला अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून व्यक्त होत आहे.
राज्यातील विविध शहर व तालुक्यात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.