शासकीय अनुदान नसतानाही; शिवसैनिकांनी सुरू केले मोफत शिवभोजन

सोलापूर – टाळेबंदीच्या काळात गोरगरीब कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये या हेतूने प्रभाग १९ मधील शिवसैनिकांनी एकत्र येत मोफत शिवभोजन थाळी ला आज दिनांक १९ एप्रिल रोजी सुरुवात केली.
MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्दार्थ खांडेकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.


महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवभोजन थाळीची घोषणा करताच प्रभाग १९ मधील शिवसैनिक देविदास कोळी यांनी तत्काळ दि. ०१ जानेवारी २०२० रोजी कोणत्याही अनुदानाची वाट न पाहता स्वखर्चाने १० रुपयात शिवभोजन देण्यास सुरुवात केली. मात्र, पुढे कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे हा उपक्रम त्यांना थांबवावा लागला होता. आत्ता पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या भागातील गोर-गरीब कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये या हेतूने प्रभागातील शिवसैनिकांनी एकत्र येत पुन्हा शिवभोजनाचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. याकरिता शिवसैनिकांनी स्वतः खर्च उचलण्यासाठी पुढाकार घेतला. देविदास कोळी व त्यांच्या मातोश्री शिवम्मा कोळी कोणतेही मानधन न घेता या उपक्रमात स्वयंपाकाचा भार उचलण्यास तयार होतेच, शिवसैनिकांच्या पुढाकाराने सध्या ११ दिवसांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रोज १०० लाभार्थ्यांना दोन चपाती, पातळ भाजी, भात आणि लोणचे असे भोजन देण्याचे सध्या नियोजन असून आवश्यकता भासल्यास यामध्ये वाढ करण्याचा मानस देखील शिवसैनिकांनी बोलून दाखविला. याप्रसंगी या भागाचे नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, युवासेना उपशहरप्रमुख राहुल गंधुरे, आनंद मुसळे, जयराम सुंचू, कोळप्पा विटकर, अमर बोडा, अनिल जमादार, सागर ढगे, सिद्धाराम खजुरगी, देवा विटकर, विनोद गायकवाड, शंकर अंजनाळकर, उमेश जेटगी, प्रसाद कदम, नितीश (पिंटू) भैरामडी, नरेंद्र क्षीरसागर व अविनाश विटकर आदी उपस्थित होते. कोवीड नियमांचे पालन करत हा उपक्रम राबविला जात आहे.