केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे.
केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे.रामविलास पासवान हे लोकजनशक्ती पार्टी (लोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. ७३ वर्षीय पासवान यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. तर ते राज्यसभा सदस्य होते.
त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट द्वारे ही माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा फोटो त्यांनी ट्विट करुन निधनाची माहिती दिली.
लोकजनशक्ती पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. भारतातील बिहार राज्यातील एका दलित परिवारात जन्माला आलेले पासवान हे बीए आणि एलएलबी पर्यंत उच्चशिक्षित आहेत. पोलीस सेवेत मिळालेल्या नोकरीत रुजू न होता त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला आणि सर्वप्रथम 1969 साली बिहार विधान परिषदेवर निवडून आले त्यांच्या बाबतीत एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे केंद्र सरकार कोणत्या का पक्षाचा असेना ते केंद्रात मंत्री असायचे.हा त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास आहे. पहिल्यांदा त्यांनी 1989 साली व्ही.पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर एच.डी देवेगौडा सरकारमध्ये मंत्री झाले. पुन्हा गुजराल सरकारमध्येही ते रेल्वेमंत्री होते.आता मोदी सरकार मध्येही ते मंत्री आहेत.