Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

MH13 News Network

दिनांक 20 ऑगस्ट रोजी मोहरम सणा निमीत्त सोलापूर आयुक्तालय हद्दीतमध्ये पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर व त्यांचे पथकातील अंमलदार शहरात गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी, तसेच अवैध धंदे व अवैध शस्त्रे यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले.

त्याच वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सचिन बंडगर, गुन्हे शाखा यांना गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, विशाल यलप्पा गायकवाड व त्याचा मित्र महादेव शंकर चव्हाण यांचेकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आहे व ते पिस्तुल घेवुन ते रेल्वे स्टेशन जवळील काडादी चाळी समोरील सिनियर सेक्शन कार्यालया समोर येणार आहेत.

 

त्यावरुन पोलिसांना बातमीची खात्री पटली लागलीच त्यांनी सापळा रचला.स.फौ आखाडे यांच्या माध्यमातून दोन पंचांना बोलावले.सातरस्ता ते रेल्वे स्टेशन जाणारे रोडवरील काडादी चाळी समोरील सिनियर सेक्शन (पुल) इंजिनिअर कार्यालय, येथील सय्यद गॅरेज बोर्डचे रोडलगतच्या फुटपाथचे आसपास सापळा लावला.


त्यात विशाल यलप्पा गायकवाड, (वय-२५ वर्षे )व्यवसाय मजुरी, रा. सेटलमेंट फ्रि-कॉलनी नं-४, सोलापूर व २) महादेव शंकर चव्हाण, वय-२९ वर्षे, व्यवसाय बांधकाम व्यवसायीक, रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल, सोलापूर, हे ठरलेल्या ठिकाणी रेल्वे स्टेशन जवळील काडादी चाळी समोरील सिनियर सेक्शन कार्यालया जवळील सय्यद गॅरेज बोर्डचे समोर आले त्यावेळी सफौ/ सुहास आखाडे यांनी बोलावून आणलेले दोन पंचासमक्ष सदर संशयीत दोन इसमांना सपोनि श्री. सचिन बंडगर व पथकातील अंमलदार यांनी गराडा घालुन पकडले.त्यावेळी पहाटेचे दोन वाजून 20 मिनिटे झाली होती.

पंचासमक्ष त्या दोघांची तपासणी करण्यात आली त्यावेळी
विशाल यलप्पा गायकवाड याचे बरमडा पॅन्टचे डावे बाजूस कंबरे जवळ एक देशी पिस्टल खोवलेल्या (लपवून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आले. तसेच त्याचे वरमोडाच्या डावे खिशात प्लॅस्टीक कॅरीबॅग मध्ये ०१ जिवंत काडतूस मिळून आले. त्यांना शस्त्राचे परवान्याबाबत विचारणा केली. परंतु त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदरचे शस्त्र हे त्यांनी बेकायदेशीर रित्या जवळ बाळगले असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही पंचांचे समक्ष त्यांचेकडे मिळून आलेले एक देशी बनावटी गावठी पिस्तुल व ०१ जिवंत काडतुस व दोन मोबाईल अशा वस्तू एकूण रक्कम रु. ६०,०००/ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन सविस्तर पंचनाम्याने जप्त केला आहे व सदर गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली आहे.
यातील आरोपी नामे विशाल यलप्पा गायकवाड, वय-२५ वर्षे. व्यवसाय मजुरी, रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी नं-४, सोलापूर, हा पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हे गार आहे. य आरोपी नामे महादेव शंकर चव्हाण, वय २९ वर्षे, व्यवसाय बांधकाम व्यवसायीक, रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल, सोलापूर, यांचेबाबत अधिक चौकशी सुरू आहे. देशी बनावटीचे गावठी पिस्तुल विक्री करता आणले की त्या गावठी पिस्तुलचा वापर कशासाठी करणार आहेत. याबाबत तपास चालू आहे.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) बापू बांगर, यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन बंडगर, सफा/सुहास आखाडे, पोलीस अंमलदार निलेश शिरूर, राजू मुदगल, विजय वाळके, प्रविण मोरे, संतोष येळे, अभिजीत धायगुडे, प्रथमेश काळेल, लक्ष्मण वसेकर, चापोना. संजय काकडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *