Big9 news
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त सोलापूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानाअंतर्गत आज रोजी सकाळी 8:00 वाजता आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून कॉंग्रेसभवन पर्यंत तिरंगा मार्च काढण्यात आला.
कॉंग्रेस भवन सोलापूर येथे सकाळी 9:00 वाजता शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमात आजी माजी आमदार, आजी ,माजी नगरसेवक, नगरसेविका, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते अतिशय उत्साहात सहभागी झाले होते.