सोलापूर (प्रतिनिधी) होटगी रोड वरील किर्लोस्कर फेरस लिमिटेड या कंपनी मुळे हवेद्वारे उडून येणाऱ्या काजळीमुळे प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने व्यवस्थापक किर्लोस्कर फेरस इंडिया लिमिटेड यांना संभाजी ब्रिगेड शहर उपाध्यक्ष रमेश तरंगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
होटगीरोड वरील अनेक नगरमध्ये किर्लोस्कर फेरस इंडिया लिमिटेड या कंपनीच्या काळी काजळी मुळे प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे तसेच ती काजळी घरातील अन्नात, पाण्यात मिसळत आहे त्यामूळे लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे या आधी सुद्धा कंपनीस वारंवार तोंडी सांगून देखिल कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही याबाबत आत्तापर्यंत वरिष्ठांना व अधिकार्यांना सांगतो असे आश्वासन दिले होते सदर धोकादायक काजळी मुळे आसपासच्या परिसरातील रहिवासी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास त्यासाठी कंपनीला जबाबदार धरून कंपनीच्या विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहर उपाध्यक्ष रमेश तरंगे यांनी दिला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे रामचंद्र कांबळे, प्रतिक गायकवाड, कासिम छप्परबंद, माळी, शिवाजी घोडके, शाहिद पटेल, गुंडप्पा जाधव ,आनंद गायकवाड, अविनाश जमदाडे ,अविनाश पवार ,गंगाधर लामतुरे, महादेव जाधव, लक्ष्मण कांबळे सौरभ जमा ,रेवन कोळी ,आकाश शाबादे, इरेस बंगले ,वाशिम चांबळी, गणेश जाधव ,कुमार गायकवाड ,अज्ञान सलगर, प्रशांत जाधव इत्यादी उपस्थित होते.
Leave a Reply