Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

प्रयास संस्थेचा अभिनव उपक्रम

प्रथम १३० वाचकाना भेट वस्तू म्हणून मेडल व सहभागी वाचकांना सन्मानपञ प्रदान करण्यात येईल

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यच्या, कर्तुत्वाचा आणि विचारांचा आदर जगभरात केला जातो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १३० व्या  जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आणि जगातही कोरोनाचे सावट गंभीर असल्याने प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने “जयंती बाबासाहेबांच्या विचारांची” या संकल्पनेतून “भारतीय संविधान प्रास्ताविकेचे” वाचन करून ङाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना
अनोख्या पध्दतीने अभिवादन करण्याचा उपक्रम राबवून भीम जयंती उत्सव साजरी करावे असे आवाहन प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केले असून याबाबत दि.१४ एप्रिल रोजी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करतानाचा विङियो सोशल मीडिया वर अपलोङ करा अथवा +91 99226 38877 या मो. क्रमांकावर विडिओ किवा लिंक पाठवून उपक्रमात सहभागी होता येईल.
प्रत्येक सहभागीस सन्मानपत्र देण्यात येईल व प्रथम १३० वाचकांना मेडल प्रदान करण्यात येईल.


शासनाच्या नियमांचे पालन करत विचारातून बाबासाहेबांना अभिवादन करत जयंती साजरी करुया.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होत बाबासाहेबांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करावा.

– सचिन शिंदे

– संथापक अध्यक्ष – प्रयास मागासवर्गीय बहु. संस्था.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *