Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापूर, प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन ,महानगरपालिका प्रशासन, आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यात विकेंड लॉकडॉऊन जाहीर केला होता. पहिल्या दिवसानंतर आज दुसऱ्या दिवशी रविवारी सोलापूर शहरात कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली होती. नागरिक घरात च्या असल्यामुळे  शहरातील रस्ते सामसूम  दिसून आले. सामान्य सोलापूरकर ,दुकानदार, व्यापारी यांनी चांगला प्रतिसाद दिला. विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर पोलीसांनी कारवाई करीत गाड्याही जप्त केल्या.

रविवारी सोलापूर शहरात सकाळी फिरायला जाणाऱ्यांना  मज्जाव करण्यात आला. तर काही ठिकाणी तुरळक गर्दी दिसून आली .कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी अडवून  कागदपत्ररे तपासत होते. काहींचे  कारण योग्य वाटत नसल्यामुळे घरी पाठवण्यात आले. बाहेर पडणाऱ्यानी मास्क न लावल्यामुळे काहींवर दंडात्मक कारवाई केली गेेली.

विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. एरव्ही गजबजणारेे रस्ते सामसूम दिसून आले. मेडिकल, दवाखान्यासाठीची वर्दळ अधिक दिसून आली. तसेच नवी पेठ, विजापूर वेस, बेगम पेठ, भुसार गल्ली या ठिकाणी लोक गप्पा मारत दुकाना बाहेर बसले होते.

सोलापूर शहरातील नवी पेठ, रेल्वे स्टेशन, रंग भवन, भगवान महावीर चौक, हैदराबाद रोड , विजापूर रोड ,पूर्वभाग , लष्कर , कन्ना चौक, अशोक चौक बाळवेस, शेळगी , मार्केट यार्ड, जोडबसवांना चौक , जुना बोरामणी नाका चौक, पूना रोड , पार्क चौक  , सात रस्ता होटगी रोड,  बाळे , सैफुल चौक, विजापूर वेस, बेगम पेठ,  डीमार्ट परिसर , जुळे सोलापूर , सोरेगाव , मोदी,  शास्त्रीनगर विमानतळ रोड, टिळक चौक, मधला मारुती, सरस्वती चौक, याठिकाणी शुकशुकाट दिसून आला.

अंजीखाने, गवळी समाजाच्या वतीने नास्ता वाटप

सोलापूर शहर जिल्ह्यात दोन दिवसाचा विकेंड जाहीर करण्यात आला. त्यामुळे गोरगरीब, वंचित, भिक्षुक लोकांना उपासमारीची वेळ आली होती. यावेळी शहरातील अंजीखाने परिवार व गवळी समाजाच्या वतीने पार्क चौक येथील वंचित व भिक्षुक लोकांना मोफत नाश्ता वाटप करण्यात आला. दानशूर व्यक्तीने हे मोफत अन्नदान करावे असे आवाहनही करण्यात आले.

जिथे प्रवाशांची गर्दी त्या ठिकाणी एसटी सुरू

विकेंड लॉकडाऊन मध्येही एसटी सेवा सुरू होती. जिथे प्रवाशांची गर्दी त्या ठिकाणी एसटी सेवा सुरू ठेवली होती. हैदराबाद ,लातूर ,पुणे या ठिकाणी गाड्या सूर्यगाड्या सुरू होत्या शनिवारी बारा फेऱ्या झाले असून एक लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. रविवारी तेवढेच फेऱ्या होतील सुमारे दोन दिवसात दोन लाखांचे उत्पन्न मिळाले. एसटी स्थानकावर सतराशे जणांचे टेस्टिंग करण्यात आले त्यामध्ये 13 जन पॉझिटिव आढळले असल्याचे सहाय्यक अधीक्षक प्रमोद शिंदे यांनी सांगितले.

अन पोलिसांनी केल्या गाड्या जप्त

कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी अडवून कागदपत्राची केली विचारणा, काहीचे कारण न पटल्यामुळे  घरी पाठवण्यात आले. तर विनाकारण बाहेर पडणाऱ्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या.  रंगभवन, सात रस्ता, पांजरापोळ चौक,  गांधी चौक, आसरा याठिकाणी कारवाई, काहींचे गाड्या जप्त करण्यात आल्या.

विविध ठिकाणी रस्त्यावरच क्रिकेटचा आनंद

दोन दिवसाचा विकेण्ड असल्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. याचा फायदा शहरातील चिमुकल्यांसह तरुणांनी घेतला. रस्त्यावरच क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. मात्र यावेळी कोणाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हते. शहरातील शास्त्रीनगर, बेगम पेठ, नवी पेठ , पूर्वभाग , लष्कर या ठिकाणी तरुण क्रिकेट खेळताना दिसले.

सिटी बस, रिक्षा धावल्या पण प्रवासी नाही

अत्यावश्यक सेवा वगळता दोन दिवसाचा लॉकडॉऊन जाहीर केल्यामुळे सोलापूरकर घराबाहेर पडलेच नाही. मात्र शहरात सिटी बस , रिक्षा धावल्या मात्र प्रवासीच नव्हते.

महापालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन तपासणी

संचार बंदी च्या काळात महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आली. संपर्कात आलेल्या रुग्णांना  क्वांरटाईन होण्यासाठी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *