Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर, प्रतिनिधी

सोलापूरात सध्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे हाल होत आहेत. रेमडिसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी गरीबांना दिवस दिवसभर पायपीट करावी लागत आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी सोलापूरसाठी 75 रेमडिसिवीर इंजेक्शन पाठवून दिले आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वेल्फेअर फंडाच्या माध्यमातून हे इंजेक्शन देण्यात आले. सोलापूर शहरातील गरीब आणि गरजू नागरीकांना हे इंजेक्शन देण्यात येणार आहेत. सध्या या इंजेक्षनच्या देखरेखेसाठी जिल्हाधिकारी यांनी समिती स्थापन केली आहे. त्या समितीकडे हे इंजेक्शन देणार असल्याची माहिती महेश गादेकर यांनी दिली.

या अगोदरही गेल्या वर्षी शरद पवार  यांनी सोलापूरकरांसाठी रेमडिसिवीर इंजेक्शन पाठवून दिले होते. शरद सोलापूरवर विषेश प्रेम आहे. सोलापूरात प्रत्येक घडामोडीवर शरद पवार यांचे लक्ष असते दुष्काळ असो अथवा इतर आपत्ती. सोलापूरला मदत मिळवून देण्यासाठी पवार हे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. आताही सोलापूरकरांच्या मदतीला पवार  धावून आल्याचे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *