Big9news Network
पेट्रोल-डिझेल वरील सर्व वाहने येत्या काळात बंद होणार असून आता इथेनॉल, बायोगॅसवरील वाहनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. अशा या इथेनॉलच्या निर्मितीसाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करून आधुनिकतेची कास धरत अर्थार्जन प्राप्त करावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी आपल्या शेतावर केलेल्या बांबू लागवडीची माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख, पाशाभाई पटेल आदींनी पाहणी केली. यावेळी पटेल बोलत होते. राजशेखर शिवदारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी पाशाभाई पटेल म्हणाले की, पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ऊस व अन्य फळ पिकांपेक्षा बांबू शेती अतिशय फायद्याची आहे. बांबू शेतीला पाणी कमी प्रमाणात लागते. त्याचबरोबर बांबूला चांगला भाव आहे व सर्व उद्योगामध्ये बांबूचा वापर केला जातो. इथेनॉल निर्मितीसाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळून नफा प्राप्त करावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. शासनाकडून यासाठी सबसिडी ही असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी बांबू लागवडीची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी शेततळ्याचीही पाहणी करून शिवदारे यांनी केलेल्या शेतीचे समाधान व्यक्त केले. यावेळी हनुमंत कुलकर्णी, प्रमोद बिराजदार, यतीन शहा, विद्याधर वळसंगे, सिलिसिद्ध कोटे, जगदेव दसाडे, विनोद बनसोडे, सागर धुळवे, अमर माने, जितेंद्र गायकवाड, आमसिद्ध कोरे, मारुती रणखांबे, बसवराज कोरे, भगवान राउत, जगन्नाथ वंजारे, राजशेखर बंडगर, फैयाज शेख, मलकरी घोडके, रेवन्नय्या स्वामी, अक्षय पाटील, गंगाराम बनसोडे आदी उपस्थित होते.
दक्षिण सोलापूर : इंगळगी येथील श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांच्या शेतावरील बांबू लागवडीची माजी सहकारमंत्री, आमदार सुभाष देशमुख, भाजपचे नेते पाशाभाई पटेल यांनी पाहणी केली.
Leave a Reply