Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

मकर संक्रांतीचे औचित्य साधून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थान मध्ये महिलांना दर्शनासाठी प्रवेश घेता यावे यासाठी बुधवारी श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आले. यात्रा काळात दोन्ही डोस घेतलेल्या महिला व विद्यार्थ्यांना मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला विद्यार्थिनींसह भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाप्रसंगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेस बिपिन पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी बिपीन पाटील यांचा सत्कार करण्यात आले. याप्रसंगी मुलींच्या कॉलेजमध्ये असे लसीकरण मोहीम राबवणे हे अतिशय स्तुत्य आहे. महिलांना मंदिरात प्रवेश मिळावे यासाठी प्रभागातील सर्वांना लसीकरण करून यात्रेचे पास काढून देत आहोत. यानंतरही आपण लवकरच पुढील लसीकरणासाठी कॅम्प नक्की घेऊ. अशी माहिती बिपीन पाटील यांनी दिले. एकूण दिवसभरात 300 विद्यार्थिनींनी लसीकरण याचा लाभ घेतले. ही मोहीम राबवण्याकरिता प्रभागातील नगरसेवक सुरेश पाटील, बिपीन पाटील, अक्षय पाटील व मेडिकल वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. देशभरामध्ये चाललेल्या कोरोना महामारी संपुष्टात आणण्यासाठी श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमध्ये हा उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या मुलींनी यामध्ये सहभाग घेतले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन एन एस एस विभाग प्रमुख प्रतिभा पाटील व आयोजक अतुल कंदले व टीमच्या सहकार्याने झाले. याप्रसंगी प्राचार्य गजानन धरणे यांनी या राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण मदत करावी असे आवाहन केले. या लसीकरण मोहिमेबद्दल बिपीन पाटील व वैद्यकीय स्टाफ यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *