Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

Big9news Network

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत आहे,तो रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संकेत दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील असेही प्रसारमाध्यमांना सांगितले होते.आज अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत पाठवलेल्या अहवालावर निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

उद्या मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध…

रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी. नाईट कर्फ्यू घोषित. राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आलीय. दिवसा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

रात्री फक्त अत्यावश्यक सेवा सुरु रहाणार. नाट्यगृह, सिनेमागृहांना आसम क्षमतेनुसार फक्त 50 टक्के ग्राहकांसाठी परवानगी

राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद. दिवसा 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार. बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना 72 तास आधीचा RTPCR चाचणी बंधणकारक राहील.

सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 50 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल

नव्या नियमावलीनुसार राज्यात काय सुरु-काय बंद?

1) राज्यातील शाळा, कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या कोचिंग क्लासेससाठी सूट देण्यात आली आहे. इतर सर्व कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असतील. हे क्लासेस ऑनलाईन सुरु असतील.

2) सरकारी कार्यालयांसाठी 50 टक्के उपस्थितीची अट ठेवण्यात आली आहे.

3) राज्यात दिवसा जमावबंदी असेल तर रात्री संचारबंदी असेल. पण अत्यावश्यक सेवांसाठी मुभा देण्यात आली आहे.

4) मैदाने, उद्याने आणि पर्यटन स्थळे पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

5) सलून 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

6) राज्यातील थिएटर फक्त 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील

7) हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंतच सुरु राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

8) स्विमिंग पूल, स्पा, जिम पूर्णत: बंद राहतील.

9) विवाहाच्या बाबतीत, मग ते बंदिस्त जागेत असो किंवा मैदान असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या ५० व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

10) सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक असो, कोणत्याही मेळाव्याच्या किंवा कार्यक्रमाच्या बाबतीत. बंदिस्त जागेत असो किंवा खुले असो, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 50 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

11) अंत्यसंस्काराच्या बाबतीत, उपस्थितांची जास्तीत जास्त संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल

12) मुंबई लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

13) दोन डोस घेतलेल्या ग्राहक आणि पर्यटकांनाच शॉपिंग मॉलमध्ये परवानगी मिळेल. यासाठी ग्राहकांना थर्मल टेस्टिंगला सामोरं जावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *