कोरोनामहामारीच्या प्रादुर्भावामुळेवर्षभरापूर्वी देशभरात प्रथम‘जनता कर्फ्यू’ आणि नंतर‘दळणवळण बंदी’ लागू करण्यातआली, परिणामीलोकांना बाहेर पडता येत नव्हते.या काळात सर्वचव्यवहार ठप्प झाल्यामुळेअनेकांना तणाव,निराशा आदीमानसिक विकारांचा सामना करावालागत होता. अशाआपत्कालीन स्थितीला तोंड देतआनंदी कसे रहायचे,तसेच या काळातमानसिक आणि आध्यात्मिक बळवाढावे, यासाठीहिंदु जनजागृती समिती आणिसनातन संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने ‘ऑनलाइन’ सत्संगमालिका चालू करण्यात आल्या.प्रौढांसाठी‘धर्मसंवाद’,बालकांसाठी‘बालसंस्कार’, तर साधनेत रुची असणार्यांसाठी‘भावसत्संग’ आणि ‘नामजपसत्संग’ या हिंदी भाषेतील 4सत्संग मालिकाआरंभण्यात आल्या.या मालिकांचीआता वर्षपूर्ती होत आहे.वर्षभरात यामालिकांना दर्शकांकडूनउत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या आपत्तीच्याकाळातही भगवान श्रीकृष्ण आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ.जयंत आठवलेयांची अपार कृपा,तसेच दर्शकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यांमुळे या मालिका वर्षभर नियमितपणे चालू आहेत. त्यामुळे या वर्षपूर्तीच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 3 एप्रिलते 10 एप्रिलया काळात ‘धर्मशिक्षा की वर्षगांठ – कृतज्ञतासमारोह’ हा कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात येणार आहेत.
सनातनसंस्थेचे संस्थापक परात्परगुरु डॉ. जयंतआठवले यांनी अध्यात्म,धर्म,संस्कार,संस्कृती,ईश्वरप्राप्तीसाठी साधना आदी विविध विषयांवरअनेक वर्षे प्रत्यक्ष साधना,संशोधन आणिअभ्यास करून अखिल मानवजातीला उपयुक्त असे लिखाण केले आहे.या सत्संगमालिकांतील ज्ञानाचा स्रोत हे मूळ लिखाणच आहे.‘बालसंस्कार’मालिकेतील ईश्वरसमानमाता-पित्याच्यासेवेचे महत्त्व,चांगले संस्कारहोण्यासाठी प्रतिदिन करावयाच्याकृती आदी विषयांमुळे भावीपिढीआदर्श आणि सदाचारी बनेल.‘धर्मसंवाद’मालिकेद्वारे हिंदु धर्माविषयीचे समाजात पसरलेले अपसमज दूरकरून धर्माची महती सांगितली जाते, हे घरबसल्या धर्मशिक्षण आहे.‘नामजप सत्संग’मालिकेत नामजपाचे महत्त्व,करण्याच्या पद्धती, प्रत्यक्षजप करणे आदी साधनेच्या संदर्भातील;तर ‘भावसत्संग’मालिकेत ईश्वराप्रतीचा भाव कसा वाढवावा, याविषयी मार्गदर्शन करण्यात येते.
‘हिंदुजागृती’आणि ‘सनातन संस्था1’या यू-ट्यूबचॅनलद्वारे, तसेच‘हिंदु अधिवेशन’ या फेसबुकपेजद्वारे या सत्संग मालिकांचे थेट प्रक्षेपण केले जाते.‘नामजप सत्संग’प्रतिदिन स. 10.30 वा.,‘भावसत्संग’प्रतिदिन दु. 2.30 वा.,‘बालसंस्कार’शनिवारी आणि रविवारी सायं.5 वा.,तर ‘धर्मसंवाद’प्रतिदिन सायं. 7वा.प्रसारित करण्यात येतात.गेल्या वर्षभरात‘नामजप सत्संग’ 79,89,622इतक्या वेळा;‘भावसत्संग’51,36, 665 इतक्यावेळा; ‘बालसंस्कार’25,78,743 इतक्यावेळा; तर‘धर्मसंवाद’ 46,86,173इतक्या वेळापाहिला गेला आहे.सर्व सत्संगमालिका एकूण 2कोटी 3लाख 31हजार 203इतक्या वेळापाहिल्या गेल्या आहे.ही आमच्यासाठी मोठी अनुभूती असल्याचे हिंदुजनजागृती समिती आणि सनातनसंस्था यांनी म्हटले आहे.सुसंस्कृतसमाज घडवण्यासाठी अशा मालिकाकाळाची गरज असून हे सत्संगनियमितपणे पहावेत,असे आवाहनहिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी केले आहे.
Leave a Reply