Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

आमदार प्रणिती शिंदे व सोलापूरातील विविध व्यापारी संघटनेच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी

सोलापूर : आज रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे कोव्हिड – 19 च्या प्रादुर्भावास नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथीलता देवून जिवनावश्यक बाबींमध्ये न येणाऱ्या दुकाने व सेवांना परवानगी मिळावी याबाबत मागणी केली.

यामध्ये कोव्हिड – 19 च्या प्रादुर्भावास नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्बंध लावण्यात आलेले आहेत. यामध्ये जिवनाश्यक वस्तुंच्या दुकानांना व सेवांना कोव्हिड – 19 चे नियम पाळून सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण त्याच प्रमाणे ज्या वस्तु व सेवा जिवनाश्यक बाबींअंतर्गत येत नाहीत म्हणून या दुकान व सेवांना दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतू या दुकान व सेवांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात गोर-गरीब कामगारांचा दैनंदिन रोजगार अवलंबून आहे. सदर दुकान व सेवा बंद असल्यामुळे यातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येत आहे. याबाबत सोलापूर सोशल फोरमने सोलापूर शहरातील विविध व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनींची आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत बैठक आयोजित केली. तरी या बैठकीमध्ये जिवनाश्यक बाबींमध्ये न येणाऱ्या दुकाने व सेवांना कोव्हिड – 19 च्या नियमांचे पालन करून सकाळी 7 ते सायं. 8 वाजेपर्यंत सुरु करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सोलापूर शहरातील व्यापारी संघटनांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत चर्चे दरम्यान केली. याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री मा. ना. श्री. उध्दव ठाकरे साहेब यांच्याशी संपर्क साधून व्यापारी व कामगारांच्या समस्यांची माहिती देवून जिवनाश्यक बाबींमध्ये न येणाऱ्या दुकाने व सेवांना कोव्हिड – 19 च्या नियमांचे पालन करून सकाळी 7 ते सायं. 8 वाजेपर्यंत सुरु करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली.

तसेच सोलापूर शहर व जिल्हयासाठी रेमिडीसिवर या कोव्हिड – 19 इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होवू नये व नियमितपणे पुरवठा करण्यात यावा. याबाबत आदेश देण्याची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे केली. तसेच सोलापूर शहर व जिल्हयातील (A Symptomatic) लक्षणे नसणाऱ्या VIP लोकांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न होता घरीच योग्य तो उपचार घ्यावा जेणेकरून लक्षणे असणाऱ्या किंवा गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होतील असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स सोलापूरचे अध्यक्ष राजू राठी, धवलभाई शहा, केतन शहा, श्रीपाद घनाते, सोलापूर उद्योग व वाणिज्य विभाग काँग्रेसचे पशुपती माशाळ, हॉटेल असोसिएशनचे प्रियदर्शन शहा, क्रिडाईचे शशिकांत जिद्दीमणी, नवी पेठ असोसिएशनचे खुशाल देढीया, शंकर होतवानी, चेतन बाफना, शैलेश बच्चूवार, माणिक गोयल, सराफ असोसिएशनचे महेश धाराशिवकर, कापड व्यापारी असोसिएशनचे नितीन जैन, इलेक्टॉनिक्स असोसिएशनचे ईश्वर मालू, आनंद येमूल, सुयोग कलाणी, भुषण भुतडा, सोलापूर गारमेंट असोसिएशनचे अमित जैन, रमेश ढाकलिया, नरेंद्र पुजारी, ॲटोमोबाइल्स असोसिएशनचे दिपक पाटील, भांडे गल्लीचे वैभव पाटील, प्रसाद डांगरे, तसेच मॉल व मल्टीप्लेक्सचे सिध्दार्थ गांधी, सोलापूर इलेक्ट्रीक असोसिएशनचे संजय सेठिया, अनिल कोठारी तसेच सोलापूर डाईझ् ॲन्ड केमिकल असोसिएशनचे मणिकांत दंड हे उपस्थित होते. यावेळी सोलापूर सोशल फोरमचे संदिप जव्हेरी यांनी सर्वांचे स्वागत व प्रस्तावना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *