MH13 NEWS Network
व्यायामाचा अभाव आणि वेळी अवेळी जंक फुड खाण्याच्या सवयींमुळे अनेक दुर्धर आजार आणि व्याधींना लोक आमंत्रण देतात, ज्याचा परिणाम त्यांच्या रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होण्या मध्ये होते. निसर्गोपचारच्या सिध्दांतानुसार आपल्या घरातल्या स्वयंपाक घरातच प्रयोगशाळा असून, भारतीय व्यंजनांच्या प्रत्येक खाद्यपदार्थत औषधी गुणधर्म लपलेले आहेत. सात्विक आहारतुन आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि अनेक व्याधी व आजारापासून आपले स्वरक्षण होऊ शकते असे सोलापूरच्या प्रसिद्ध नेचरोपॅथी डॉ.सोनाली घोंगडे यांनी विचार व्यक्त केले.
स्वयंपाक घराची संपूर्ण जबाबदारी ही स्त्रीयांकडे असल्याने प्रत्येक घरातील स्त्री ही एकप्रकारची त्या घराची डॉक्टर असून, त्यांच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंब सदस्यांच्या आरोग्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. कोरोना काळात भारताच्या प्रत्येक स्त्रीने आपले कर्तव्य यथोचितपणे पार पाडल्यामुळे भारत कोरोना विरुद्ध लढा यशस्वीपणे लढत असल्याची भावना सुमेध फाऊंडेशनच्या अध्यक्षा जानवी माखिजा यांनी त्यांच्या प्रास्ताविकेत मांडले. सुमेध फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणारे सर्व उपक्रम हे समाजासाठी प्रेरक असल्याचे गौरवोद्गार गीता राजानी यांनी फाऊंडेशनच्या कार्याविषयी काढले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी सकस आणि पौष्टिक आहार, नियमित योगा, प्राणायाम व व्यायाम आणि शासनाने कोरोना विषयक निर्देशित केलेल्या नियमांचे पालन केल्यास भारत लवकरच कोरोनामुक्त होऊन इतर देशांसाठी प्रेरणास्रोत होईल असा आशावाद विजय कुंदन जाधव यांनी व्यक्त केला. सुमेध फाऊंडेशनच्या वतीने आयोजित आहार एक औषध ह्या विषयावरच्या व्याख्यानावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जानवी माखिजा, भारती माखिजा, रती माखिजा, राज माखिजा, युक्ता माखिजा, विषेश अतिथी गीता राजानी, संध्याराणी बंडगर, संदीप पिस्के, सिद्धराय म्हेत्री आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय कुंदन जाधव यांनी केले, आभार अर्जुन अष्टगी यांनी मानले.
Leave a Reply