कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी, पुरवठादारांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सात सदस्यीय समिती गठीत केली आहे. प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहायक अधिष्ठाता डॉ. पुष्पा अग्रवाल , आयएमएचे डॉ. मिलिंद शहा, अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांचा समावेश करण्यात आला असून औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त नामदेव भालेराव यांच्यावर सदस्य सचिवची जबादारी सोपविण्यात आली आहे.
ही समिती अचानकपणे खासगी रुग्णालयात जाऊन रेमडेसिवीरचा उपयोग योग्य पद्धतीने होतो का नाही ? याची खातरजमा करणार आहे. या इंजेक्शनसाठी ही समिती राज्यस्तरावरील एफडीएच्या कंट्रोल रुमशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करणार आहे. औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून होणारा पुरवठा, वाटप यावर नियंत्रण ठेवणे व पुरवठादारांवर नियंत्रण ठेवणे, रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेण्याचे काम ही समिती करणार आहे. कोविड हॉस्पिटलला या इंजेक्शनचा प्रथम पुरवठा केला जाणार आहे. इंजेक्शन मिळत नसल्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरणही समिती करणार आहे.
रिकाम्या बाटल्या नष्ट करू नयेत रुग्णांसाठी वापरण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या नष्ट करू नयेत. या बाटल्या तपासणीच्यावेळी समितीला दाखवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या आदेशात दिल्या आहेत. औषध दुकानांमध्ये उपलब्ध असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन डॉक्टरांनी प्रमाणित करून दिल्यानंतरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. औषध दुकाने व खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध असलेला रेमडेसिवीरचा साठा आज ( रविवारी ) जाहीर केला जाणार आहे.
तक्रार असल्यास यांच्याशी करा संपर्क –
अध्यक्ष हेमंत निकम- 9889931121
डॉ. प्रदीप ढेले – 9423075732
डॉ. पुष्पा अग्रवाल- 9823373153
डॉ. शीतलकुमार जाधव- 9403694080
डॉ. मिलिंद शहा- 9822096280
प्रदीप राऊत- 9987333415
नामदेव भालेराव- 9405783636