MH13 News Network
सोलापूर ग्रामीणमध्ये आज तब्बल 562 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
आज रविवारी 4 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 562 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 361 पुरुष तर 201
महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 340 आहे. यामध्ये पुरुष 217 तर 123 महिलांचा समावेश होतो .आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 6104 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 5542 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.