BIG9News Network
येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे रहा – डॉ. किरण देशमुख
सोलापूर – प्रभाग ५ अ अंबिका नगर बाळे येथे आमदार स्थानिक निधीतून ड्रेनेज लाईन घालण्याच्या कामाचे उद्घाटन नगरसेवक डॉ.किरण देशमुख आणि प्रभागाच्या नगरसेविका स्वाती ताई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रभागातील नागरिकांना इतर नगरसेवकांनी फक्त आश्वासन दिलेले आहे आम्ही आश्वासन न देता ड्रेनेजच्या कामाला सुरुवात करत आहोत. येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाच्या पाठीशी बाळे येथील नागरिकांनी उभे रहावे अशी विनंती डॉ.किरण देशमुख यांनी बोलताना केली.
अंबिका नगर भागामध्ये ड्रेनेजचे तर काम सुरू झाले आहे येत्या काळामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी विकास योजनेतून २१ लाख रुपये मंजूर केलेले आहेत ड्रेनेज झाल्या झाल्या रस्त्याचे काम सुरू करणार आहे असे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे यांनी बोलताना दिले.आम्हाला 2 वर्षे काम करण्याची संधी मिळाली.आम्ही एकदा मापं घेतलं की दुसऱ्यांदा उद्घाटनासाठी येतो. शिवाजीनगर च्या कामासाठी बार लाखांचा निधी दिला. ‘उत्तर’चा खऱ्या अर्थाने विकास आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला. आपल्या माणसाला आपण मोठं केलं पाहिजे. राजाभाऊ आलुरे यांना जनतेचा नगरसेवक नाही तर महापालिकेचे नगरसेवक करा अशी भावनिक साद यावेळी समाधान आवळे यांनी घातली.
आ.विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि नगरसेविका स्वातीताई आवळे यांच्यावतीने प्रभाग ५ मधील विकास करण्यात आलेला आहे असे मत युवानेते राजाभाऊ आलूरे यांनी मांडले.
यावेळी प्रभागाच्या नगरसेविका स्वातीताई आवळे, सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे, विजय ढेपे, राजाभाऊ आलूरे, वार्ड अध्यक्ष मंजुषा डोईफोडे, धनराज शिंदे, विनोद गाजले, विकास घुगे, गणेश काळे, किरन घोलवे, मंगेश घुले, बाळू पवार, अण्णा भोसले, नितीन सर्वगोड, शिवलिंग शिवपुरे, नाना शिंदे, सुहास माने, शांताताई गजले, मिनाबाई घुगे, सुनीता शिंदे, रसूल शेख, रुक्मिणी कदम व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply