Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

दि.15 : कोरोनाने अनेक देशात कहर केला आहे. भारतासह अनेक देशात रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्ण संख्या वाढत आहे का? हेही पाहणे गरजेचे आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे दुष्परिणाम समोर आले आहेत.

कोरोनाचा नवा स्ट्रेन (Corona Strain) मुख्य लक्षण असणाऱ्या तापाबरोबरच डायरिया, पोटदुखी, उलटी होणे, अपचन यांसारखी लक्षण दाखवत आहे. दरम्यान जसजसे याचे संक्रमण वाढत आहे तसतसे या लक्षणांची व्याप्ती देखील वाढत आहे.

भारतात वेगाने फैलावत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही गेल्यावर्षी पसरलेल्या संक्रमणापेक्षा अधिक भयानक असल्याचे चित्र आहे. दरम्यान काही डॉक्टरांच्या मते कोरोना संक्रमणाचा थेट परिणाम कान आणि डोळ्यांवर होत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन (Corona Strain) मुख्य लक्षण असणाऱ्या तापाबरोबरच डायरिया, पोटदुखी, उलटी होणे, अपचन यांसारखी लक्षण दाखवत आहे. दरम्यान जसजसे याचे संक्रमण वाढत आहे तसतसे या लक्षणांची व्याप्ती देखील वाढत आहे.

केजीएमयू आणि एसजीपीजीआय अनेक कोव्हिड रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांना ऐकण्याची आणि दिसण्याची समस्या येते आहे. या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या रुग्णालयात भरती अनेक रुग्णांना दिसण्याची आणि ऐकण्याची समस्या येते आहे. या तज्ज्ञांच्या मते असे अनेक रुग्ण आहेत, ज्यांना दोन्ही कानाने ऐकू येत नाही. तर काही कोरोना बाधित रुग्णांनी दिसत नसल्याची तक्रार केली आहे. या तज्ज्ञ डॉक्टरांनी असे म्हटले आहे की, रुग्णांची अवस्था गंभीर असल्यामुळे त्यांच्या शरिरातील इतर अवयव यामुळे प्रभावित होत आहेत. अशावेळी डोळे आणि कानांवर देखील परिणाम होत आहे.

तज्ज्ञांच्या मते, आता कोरोनाने त्याचं रूप बदललं आहे आणि त्या नंतर चिंता अधिक वाढली आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता याबाबतीत बेजबाबदार न वागता कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. हाच एकमात्र उपाय आहे. दरम्यान नवीन स्ट्रेन चिंताजनक असला तरी डॉक्टरांनी एक दिलासादायक बाब देखील नमूद केली आहे. त्यांच्या मते जर रुग्णामध्ये प्रतिकारक्षमता व्यवस्थित असेल तर हा स्ट्रेन संबंधित रुग्णाला अधिक त्रास देणार नाही, तर 5 ते 6 दिवसात रुग्ण परिस्थिती पूर्ववत देखील होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *